मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पतीचे परस्त्रीसोबत संबंध, घरात शिवीगाळ आणि मारहाण; पीडितेचं टोकाचं पाऊल

पतीचे परस्त्रीसोबत संबंध, घरात शिवीगाळ आणि मारहाण; पीडितेचं टोकाचं पाऊल

 प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

आरोपी पती हा लग्नानंतरही दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंधात होता. याच प्रेमसंबंधावरुन तो पत्नीसोबत भांडण करायचा. त्यातून तो आपल्या पत्नीला मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायचा.

  • Published by:  Chetan Patil

पुणे, 25 नोव्हेंबर : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या (Woman Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित घटना ही पिंपरी येथील यमुनानगर, निगडी (Nigdi) येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मृतक महिलेच्या भावाने आपल्या पाहुण्यांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे अनेकांना धक्का बसला आहे. महिलेच्या भावाने निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi Police Station) याबाबत तक्रार (Complaint) देखील केली आहे. आपल्या मृतक बहिणीचे 30 वर्षीय पती युवराज घारगे (Yuvraj Ghorge) हेच तिच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. निगडी पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीवर गुन्हा (Case filled) दाखल केला आहे.

मृतक महिलेच्या भावाने नेमके काय आरोप केले आहेत?

मृतक महिलेच्या भावाने पोलिसात त्याच्या पाहुण्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्याने आपल्या बहिणीच्या आत्महत्येमागे तिचा पती युवराज हाच कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. आरोपी पती हा लग्नानंतरही दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंधात होता. याच प्रेमसंबंधावरुन तो पत्नीसोबत भांडण करायचा. त्यातून तो आपल्या बहिणीला मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायचा. आरोपीने त्याच्या पत्नीला अनेकवेळा अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली होती. पण त्याची पत्नी हे सगळं निमूटपणे सहन करत राहिली. अखेर वैवाहिक आयुष्यातील वेदना असह्य झाल्याने तिने टोकाचा निर्णय घेतला. तिने घरात ओढणीच्या साहाय्याने पंख्याला लटकून गळफास घेतला, असा दावा मृतक महिलेच्या भावाने केला आहे.

हेही वाचा : प्रेयसीच्या आत्महत्येचा धक्का; प्रियकरानेही शेतात घेतला गळफास, नगरमधील घटना

आत्महत्या हा शेवटचा पर्याय नाही

आयुष्यातील कोणत्याही संकट किंवा समस्येवर आत्महत्या हा पर्याय असूच शकत नाही. कोणत्याही संकटाला आपल्याला सामोरं जावंच लागेल. पण या संकटाला सामोरं जाताना धैर्याने लढलं पाहिजे. आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेतल्याने आपलंच नुकसान होतं. उलट त्यातून आपली सुटका होत नाही तर अनेक प्रश्न निरुत्तरीत सोडून आपण निघून गेलेलो असतो. निगडीतील महिलेला आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याऐवजी पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेता येऊ शकला असता. त्यासाठी मनाला थोडं घट्ट करावं लागलं असतं, पण मोकळा श्वास घेता आला असता, अशी चर्चा सध्या संबंधित परिसरात सुरु आहे.

First published:

Tags: Pune news, Pune police