पानीपत, 26 ऑगस्ट : प्रॉपर्टीच्या (
property) लालसेपायी एका पतीनं (
Husband) आपली पत्नी (
wife) आणि मुलं (
kids) यांना घरात कोंडून पेटवून
(fired the house) दिल्याची घटना घडली आहे. पत्नीच्या नावे असणारं घर तिने स्वतःच्या नावे करावं, यासाठी या पतीने गेल्या कित्येक दिवसांपासून तगादा लावला होहरता. याच कारणावरून झालेल्या भांडणानंतर त्याने स्वतःच्या पत्नी आणि मुलांना घरात कोंडून घर पेटवून दिलं. पत्नीनं केलेल्या आरडाओरड्यानंतर शेजारी मदतीला धावले आणि या सर्वांचा जीव वाचला.
हुंड्यासाठी करत होता छळ
हरियाणातील पानीपतमध्ये राहणाऱ्या प्रदीप उर्फ लंबूचं 15 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्याला 2 मुलं आहेत. पत्नीने माहेराहून हुंडा आणावा, यासाठी तो सतत तिचा छळ करत असल्याची पत्नीची तक्रार आहे. पत्नीनं दिलेल्या माहितीनुसार तिची सासू आणि नणंद यांनी पतीला फूस लावल्यानंतर त्याने हुंड्यासाठी छळ करायला सुरुवात केली. त्यात त्याला दारूचंही व्यसन असल्यामुळे अनेकदा तो दारूच्या नशेत घरी येऊन मुलांना बेदम मारहाण करत असे.
माहेरातून आणले 5 लाख
एकदा पत्नीनं माहेरातून 5 लाख रुपये आणले आणि एक घर विकत घेतलं. मात्र या घराचं रजिस्ट्रेशन पत्नीच्या नावे झाल्याची बाब तिच्या सासरच्यांना मान्य नव्हती. हे घर आपल्या नावावर करून द्यावं, यासाठी पतीनं तिच्यामागे तगादा लावला होता. अनेकदा गोड बोलून तर बऱ्याचदा मारहाण करून तो तिला घर नावे करून द्यायला सांगत असे. मात्र पत्नी त्याला तयार नव्हती. याच मुद्द्यावरून झालेल्या भांडणात पतीने पत्नी आणि मुलांना घरात डांबले आणि घराला आग लावली.
हे वाचा -
पंजशीरमध्ये नॉर्दन आघाडीसोबत तालिबानची बैठक, दोन्ही गटांनी घेतला मोठा निर्णय
शेजाऱ्याने केली सुटका
आग लागल्यावर पत्नीने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी मदतीला धावून आले आणि त्यांनी महिला आणि मुलांना बाहेर काढलं. या घटनेनंतर पत्नीनं पतीविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार नोंदवली आहे. पती आणि सासरच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.