पहाटेच सुरू झाले दोघांचे भांडण, संतापलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल आणि....

पहाटेच सुरू झाले दोघांचे भांडण, संतापलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल आणि....

पन्हाळा तालुक्यातील माले येथे आज पहाटे ही धक्कादायक घटना घडली आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 25 सप्टेंबर  : घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्‍यात लोखंडी घण घालून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळामध्ये घडली आहे.

पन्हाळा तालुक्यातील माले येथे आज पहाटे ही धक्कादायक घटना घडली आहे. पती दत्तात्रय पाटील स्वतःहून कोडोली पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. घडलेल्या या घटनेनंतर संपूर्ण पन्हाळा तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.

नगरमध्ये राजकारणाला नवे वळण, सेनेनं घेतली माघार; राष्ट्रवादीने मारली बाजी

मिळालेल्या माहितीनुसार, मृत पत्नी शुभांगी पाटील (वय 30)  यांचा 10 वर्षांपूर्वी पन्हाळा तालुक्यातील दत्तात्रय पाटील (वय 35) याच्याशी विवाह झाला होता. त्यांना 8 आणि 4 वर्षांची दोन लहान मुलं सुद्धा आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पती पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वाद सुरू होते. आज पहाटे सुद्धा दोघांमध्ये वाद झाला. या वादातून पती दत्तात्रय पाटील याने पत्नीच्या डोक्यात लोखंडी घन घातली. डोक्यात जोरदार प्रहार झाल्यामुळे पत्नी रक्ताच्या थारोळ्यात जागीच कोसळली. यातच त्यांचा मृत्यू झाला.

दोन महिन्यातील सर्वात कमी स्तरावर पोहोचले सोन्याचे दर,वाचा आज काय होणार बदल

पत्नीची हत्या केल्यानंतर दत्तात्रय पाटील स्वतःहून कोडोली पोलिसांत दाखल होऊन घडलेल्या प्रकाराबाबत त्याने पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शुभांगी पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.

Published by: sachin Salve
First published: September 25, 2020, 12:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading