मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Insurance चे पैसे हडपण्यासाठी पतीने केला पत्नीचा खून, फिल्मी स्टाईल डाव झाला उघड

Insurance चे पैसे हडपण्यासाठी पतीने केला पत्नीचा खून, फिल्मी स्टाईल डाव झाला उघड

विम्याचे पैसे हडपण्यासाठी पतीनंच आपल्या पत्नीचा निर्घृण खून केल्याची (Husband kills wife to get money of insurance) घटना नुकतीच उघडकीला आली आहे.

विम्याचे पैसे हडपण्यासाठी पतीनंच आपल्या पत्नीचा निर्घृण खून केल्याची (Husband kills wife to get money of insurance) घटना नुकतीच उघडकीला आली आहे.

विम्याचे पैसे हडपण्यासाठी पतीनंच आपल्या पत्नीचा निर्घृण खून केल्याची (Husband kills wife to get money of insurance) घटना नुकतीच उघडकीला आली आहे.

  • Published by:  desk news

टेक्सास, 29 नोव्हेंबर: विम्याचे पैसे हडपण्यासाठी पतीनंच आपल्या पत्नीचा निर्घृण खून केल्याची (Husband kills wife to get money of insurance) घटना नुकतीच उघडकीला आली आहे. जीवन विमा काढताना बहुतांश वेळा व्यक्ती त्यांच्या जीवनसाथीचं नाव त्यांचा (nominee of life insurance policy) वारसदार म्हणून नोंदवतात. मात्र त्यानंतर पैशांचा मोह अनावर झाल्यामुळे आपल्याच जोडीदाराचा जीव घेत असल्याचं दिसून आलं आहे.

विम्यासाठी केला खून

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये राहणारा ख्रिस्तोफर कॉलीन्स आणि त्याची पत्नी युआन हुआ लिआंग यांनी लाईफ इन्शुरन्स घेतला होता. 1.4 कोटी रुपयांचं संरक्षण असणारा हा विमा घेतल्यानंतर पती ख्रिस्तोफरच्या मनात पैशांचा मोह निर्माण झाला. पत्नीचा मृत्यू झाला तर पतीला 1 कोटी 40 लाख रुपये मिळण्याची हमी देणारी ही पॉलिसी होती. ही पॉलिसी काढल्याचा दुसऱ्याच दिवशी युआनचा खून झाल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी पहिला संशय तिच्या पतीवरच घेतला.

पतीने रचला बनाव

घटनेच्या दिवशी पतीचे स्वतःच पोलीस ठाण्यात फोन केला आणि आपल्या घरात काही चोर घुसल्याचं सांगितलं. आपण फोनवर त्यापैकी काही पुरुषांचा आवाज ऐकला असून आपल्या पत्नीला त्यापासून धोका असल्याचं त्यानं सांगितलं. पोलिसांनी तातडीनं आपल्या घरी जाऊन पत्नीची चोरांच्या तावडीतून सुटका करावी, अशी विनंती त्यानं पोलिसांना केली. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना युआन मृतावस्थेत पडल्याचं दिसून आलं.

ख्रिस्तोफरचा ड्रामा

घरी पोहोचल्यानंतर पत्नीचा मृतदेह पाहून धक्का बसल्याचं नाटक करत त्याने आपल्या हातातील बॅग दूर फेकली आणि तिच्या मृतदेहापाशी जाऊन ढसाढसा रडू लागला. त्याचं वागणं पोलिसांना नाटकी आणि संशयास्पद वाटल्यामुळे त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

हे वाचा- ऑनलाइन गांजा विक्री प्रकरणी पाच जणांना अटक;700 किलो गांजा डिलीव्हर केल्याचा संशय

असा केला खून

पत्नीला अगोदरच गोळी मारून पतीनं तिची हत्या केली होती. त्यानंतर घर बंद करून तो कार्यालयात गेला आणि पोलिसांना फोन करून हत्येचा बनाव रचला. चोरट्यांनी पत्नीचा खून केल्याचं भासवून विम्याचे पैसे लाटण्याचा त्याचा डाव होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो फसला. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Murder, Police, Wife and husband