मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

धक्कादायक! 8 दिवसांचं लव्ह मॅरेज, नवव्या दिवशी केला पत्नीचा खून

धक्कादायक! 8 दिवसांचं लव्ह मॅरेज, नवव्या दिवशी केला पत्नीचा खून

प्रेमविवाह केल्याच्या नवव्या (Husband kills wife on ninth day of marriage) दिवशीच पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

प्रेमविवाह केल्याच्या नवव्या (Husband kills wife on ninth day of marriage) दिवशीच पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

प्रेमविवाह केल्याच्या नवव्या (Husband kills wife on ninth day of marriage) दिवशीच पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

  • Published by:  desk news

दिल्ली, 24 ऑक्टोबर: प्रेमविवाह केल्याच्या नवव्या (Husband kills wife on ninth day of marriage) दिवशीच पतीनं पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. कोर्टात आंतरधर्मीय प्रेमविवाह केलेल्या या जोडप्याचं लग्न झाल्यावर (Fight after marriage) त्यांच्यात जोरदार वादावादीला सुरुवात झाली होती. रागाच्या भरात पतीने (Husband stabbed wife) पत्नीचा खून केला.

आठ दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

मूळचा उत्तर प्रदेशचा नागरिक असणारा मुहम्मद आझाद हा दिल्लीत ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याचं 19 वर्षांच्या कीर्तीसोबत गेल्या काही महिन्यांपासून अफेअर होतं. दोघांचंही एकमेकांवर प्रेम असल्यामुळे त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय केला. आठच दिवसांपूर्वी त्यांनी एकमेकांशी कोर्टात जाऊन लग्न केलं होतं आणि संसाराला सुरुवात केली होती.

लग्नानंतर बदललं नातं

लग्नापूर्वी एकमेकांवर नितांत प्रेम करणाऱ्या मुहम्मद आणि कीर्ती यांचं लग्नानंतर मात्र भांडण व्हायला सुरुवात झाली. लग्नाच्या पहिल्या रात्रीपासूनच त्यांच्यात कुठल्या ना कुठल्या विषयावरून मतभेद होत होते. त्यांच्या घरातून सतत भांडणाचे आवाज येत असल्याचं त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितलं आहे. लग्नाच्या नवव्या दिवशी कीर्तीचा जोरदार किंकाळी फोडल्याचा आवाज ऐकून शेजारी त्यांच्या घरी आले. तेव्हा कीर्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि मुहम्मद तिच्यावर चाकूने हल्ला करून गायब झाला होता. शेजाऱ्यांनी कीर्तीच्या भावाला फोन करून घटनेची कल्पना दिली.

पोलीस तपास सुरू

पोलिसांना कीर्तीच्या भावाने पीसीआर कॉल केल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कीर्तीचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून देण्यात आला. तपासाची चक्रं फिरवत पोलिसांनी मुहम्मदलाही अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीशी वाद झाल्यानंतर मनावरचा ताबा सुटल्याने आपण तिचा खून केल्याचं मुहम्मदनं कबूल केलं आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Crime, Delhi, Murder, Wife and husband