मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /संतापजनक! चटणी चांगली न बनवल्यानं पत्नीला अमानुष मारहाण; घटनेत महिलेचा जागीच मृत्यू

संतापजनक! चटणी चांगली न बनवल्यानं पत्नीला अमानुष मारहाण; घटनेत महिलेचा जागीच मृत्यू

एपीएमसी परिसरातील गटारामध्ये एक पिशवी आढळून आली होती. या पिशवीतून दुर्गंधी येत होती.

एपीएमसी परिसरातील गटारामध्ये एक पिशवी आढळून आली होती. या पिशवीतून दुर्गंधी येत होती.

घटनेत एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची केवळ या कारणासाठी हत्या (Husband Killed Wife) केली, कारण तिनं चटणी चांगली बनवली नाही.

भोपाळ 03 ऑगस्ट : हत्येची (Murder) एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. अनेकदा आपण घरगुती वादातून पती-पत्नीची हत्या झाल्याच्या बातम्या पाहिल्या असतील. मात्र, आता समोर आलेलं प्रकरण अगदीच विचित्र आहे. या घटनेत एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची केवळ या कारणासाठी हत्या (Husband Kills Wife) केली, कारण तिनं चटणी चांगली बनवली नाही. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) दतिया येथून समोर आली आहे.

एका हातानं गळा अन् दुसऱ्या हातानं दाबलं तोंड; 2वर्षाच्या मुलीचा आईनंच घेतला जीव

आनंद गुप्ता नावाच्या एका व्यक्तीचं सामोसे आणि कचोरीचं एक दुकान होतं. दुकानात लागणारी चटणी आनंद गुप्ताची पत्नी घरीच तयार करत असे. नेहमीप्रमाणं पत्नीनं रविवारीही दुकानात लागणारी चटणी बनवली. यानंतर आनंदनं ही चटणी चाखून पाहिली. मात्र, चटणी चांगली झाली नसल्याचं सांगत आनंद यानं आपल्या पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर आनंदची आई मध्ये येऊन त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू लागली. मात्र, राग अनावर झालेल्या आनंदानं कोणाचंही ऐकलं नाही आणि तो आपल्या पत्नीला मारहाण करत राहिला. यातच महिलेचा मृत्यू झाला.

'कपड्यांप्रमाणे बदलतो बायको'; 6 लग्न करणाऱ्या माजी मंत्र्याचा भांडाफोड

पत्नीचा मृत्यू झाल्याचं लक्षात येताच आनंद गुप्ता यानं घटनास्थळावरुन पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मात्र तोपर्यंत आनंद फरार झाला होता. पोलिसांनी आनंद गुप्ता याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून सध्या त्याचा शोध सुरू आहे. या विचित्र घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Crime news, Murder news