भोपाळ, 8 सप्टेंबर : पत्नीने (
Wife) स्वयंपाक (
cooking) न केल्याच्या किरकोळ कारणावरून पतीने (
Husband) डोक्यात दगडाने वार (
attack by stone) करून तिचा खून (
Murder) केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. स्वयंपाकाच्या मुद्द्यावरून पती आणि पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर राग अनावर झालेल्या पतीने दगडाने पत्नीच्या डोक्यात वार करून तिची हत्या केली.
असं झालं भांडण
ही घटना आहे जबलपूरमधील. पप्पू गढवाल आणि शालिनी हे दोघं अनेक वर्षांपासून एकत्र राहत होते. काही दिवासांपूर्वीच दोघांनी लग्न केलं होतं. मात्र त्यानंतर वारंवार छोट्या मोठ्या काऱणावरून त्यांच्यात भांडणं होत होती. काही दिवसांपूर्वी शालिनीने स्वयंपाक न केल्याच्या कारणावरून दोघांमध्ये भांडणं जुंपली. हे भांडण विकोपाला गेलं आणि पप्पूने डोक्यात दगडाने वार करून शालिनीचा खून केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शालिनीला तिथेच सोडून पप्पूने तिथून पळ काढला. त्यानंतर काही वेळातच शालिनीचा मृत्यू झाला.
पोलिसांनी शोधलं कारण
शालिनी ही घरात मरून पडली असल्याची बातमी शेजाऱ्यांनी कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्ट मॉर्टेमसाठी पाठवून दिला. डोक्यात वार झाल्यामुळे मृत्यू झाल्याचं त्यातून स्पष्ट झालं. पोलिसांनी चौकशी केली असता शालिनी ही पप्पू नावाच्या व्यक्तीसोबत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परिसरातील अनेकांनी दोघांना एकत्र जाता-येतानाही पाहिलं होतं. पोलिसांनी पप्पूचा शोध घेऊन त्याला अटक केली.
हे वाचा -
आसाममध्ये भीषण अपघात, 100 प्रवासी असलेल्या दोन बोटींची टक्कर, पाहा VIDEO
माहेरी जात असल्याचा राग
आपली पत्नी परवानगी न घेता वारंवार माहेरी जात असल्याचा राग पप्पूच्या डोक्यात असल्याचं पोलीस चौकशीत स्पष्ट झालं. त्यावरून त्यांची वारंवार भांडणं होत होती. हा राग मनात असतानाच स्वयंपाकाच्या मुद्द्यावरून भांडण झाल्यामुळे रागाच्या भरात आपण पत्नीच्या डोक्यात 3 वेळा दगड मारून तिची हत्या केल्याची कबुली पप्पूने दिली आहे. पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.