लखनऊ, 30 ऑक्टोबर : कडाक्याच्या भांडणात इगो दुखावल्याने माथेफिरू (
Husband kills wife as his ego got hurt) पतीने पत्नीची हत्या केली. पत्नीच्या माहेरी गेलेल्या पतीने कडाक्याच्या भांडणानंतर (
slit the throat) पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली आणि सासूवरदेखील जीवघेणे वार केले. स्थानिकांची हा घटनेची माहिती पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पतीला दारूचे व्यसन
उत्तर प्रदेशातील काकोरीमध्ये अनिल द्विवेदी याचा विवाह प्रिया नावाच्या महिलेसोबत झाला होता. पतीशी झालेल्या भांडणानंतर पत्नी माहेरी राहायला आली होती. आपल्याशी भांडून पत्नी माहेरी राहायला गेल्याचा राग अनिलच्या मनात होता. पत्नीला जाब विचारण्याच्या उद्देशाने तो तिच्या माहेरी गेला आणि या विषयाला तोंड फुटलं
वादानंतर खून
पत्नी माहेरी राहायला आल्याच्या विषयावरून वादाला सुरुवात झाली. दोघांचेही आवाज चढले आणि हे भांडण विकोपाला पोहोचलं. त्यामुळे अहं दुखावल्या गेलेल्या पतीने पत्नीवर धारदार शस्त्रानं वार केले. तिच्या गळ्यावर वार झाल्यामुळे पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि काही वेळातच तिचा जीव गेला. हा प्रकार सुरू असताना भांडण सोडवण्यासाठी अनिलच्या सासूने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिच्यावरदेखील अनिलने जीवघेणे वार करत तिला खाली पाडले. या हल्ल्यात सासू गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
हे वाचा -
लैंगिक चाळे करणाऱ्या विकृताला अद्दल, मार्शल आर्टिस्ट महिलेनं शिकवला धडा
पोलीस तपास सुरू
पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केल्यानंतर अनिलचा शोध घेतला. खून केल्यावर घटनास्थळावरून फरार झालेल्या अनिलला पोलिसांनी काही तासांतच शोधून काढले आणि अटक केली. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तात्कालिक वादातून हा खून झाला की खुनाचा डाव आखूनच आरोपी घटनास्थळी आला होता, या पोलीस शोध घेत आहेत. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.