मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

गर्भवती पत्नीसोबत संभोग सुरू असतानाच पतीने गळ्यावर फिरवला ब्लेड

गर्भवती पत्नीसोबत संभोग सुरू असतानाच पतीने गळ्यावर फिरवला ब्लेड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिला या धंद्यासाठी आपली खोली भाड्याने द्यायच्या आणि त्याचे त्यांना पैसे मिळायचे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिला या धंद्यासाठी आपली खोली भाड्याने द्यायच्या आणि त्याचे त्यांना पैसे मिळायचे.

पत्नीसोबत सेक्स करत असताना त्याने तिच्या गळ्यावर ब्लेडने वार केला आणि तिचा जीव घेतल्याची कबुली त्याने दिली आहे.

  • Published by:  Renuka Dhaybar
न्यूयॉर्क, 16 फेब्रुवारी : एका 21 वर्षीय व्यक्तीने सेक्स करताना रेजर ब्लेडने आपल्या पत्नीच्या खून केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी असा दावा केला आहे की, पतीनेही याची कबुली दिली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की घटनेनंतर आरोपीने स्वतःचा जीवही संपवण्याचा प्रयत्न केला. ब्राझीलमधील साओ पाओलो राज्यातल्या वर्गी पॉलिस्टा नावाच्या शहरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर 21 वर्षीय आरोपी मार्सेलो अरौजो याला पोलिसांनी अटक केली. पत्नीसोबत सेक्स करत असताना त्याने तिच्या गळ्यावर ब्लेडने वार केला आणि तिचा जीव घेतल्याची कबुली त्याने दिली आहे. मर्सिलोची पत्नी फ्रॅसिन 22 वर्षांची होती. रागाच्या भरात तरूणाने आपल्या पत्नीची हत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 22 डिसेंबर 2019 च्या घटनेसंदर्भात पोलिसांनी सांगितले की 6 आठवड्यांच्या तपासणीनंतर घटनेशी संबंधित अनेक पुरावे सापडले. यापूर्वी आरोपींनी घटनेबाबत वेगवेगळी विधाने केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रॅसिन तिसऱ्यांदा गरोदर राहिली होती. यामुळे तिच्यात आणि पतीमध्ये वाद झाला होता. पतीला ही प्रेग्नेंन्सी मान्य नव्हती. त्यामुळे त्याने सेक्स सुरू असतानाच पत्नीची हत्या केली. या सगळ्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहे. इतर बातम्या - भर रस्त्यात प्रियकराने घातल्या प्रेयसिला गोळ् पोलिस दांपत्याच्या घरी पोहोचले तेव्हा पतीचीही प्रकृती चिंताजनक होती. त्याच्या मनगटावर आणि गळ्यावर जखमा होत्या. त्याने पत्नीची हत्या केल्यानंतर स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आज महाराष्टाच्या नाशिकमध्येही पती-पत्नीच्या वादामुळे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बसस्थानकावर प्रेमसंबंधातील वादातून एका 30 वर्षीय महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ही महिला 67 टक्के भाजली असून दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, सदर महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला आज मुंबईत हलविण्यात येणार आहे. पहाटे 3च्या सुमारास पीडित महिलेची प्रकृती गंभीर झाल्यानं डॉक्टरांनी तिला मुंबईत उपचारासाठी दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील भायखळा इथल्या मसीना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. या पीडित महिलेला 3 अपत्ये आहेत. महिलेच्या पहिल्या पतीचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. पतीच्या निधनानंतर रामेश्वर मधुकर भागवत याचेशी दोन महिन्यापूर्वीच निमगाव वाकडा येथील रेणुका माता मंदिरात विवाह केला होता. त्यानंतर संशयित आरोपी रामेश्वर पुन्हा दुसरं लग्न करण्याच्या तयारीत असल्याचं समजल्यानं गेल्या दोन-तीन दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते. त्यातूनच हा धक्कादायक प्रकार घडल्याचं सांगितलं जातं आहे. प्राथमिक माहितीनुसार, या महिलेला पेटवून दिल्याचं सांगितलं जात असलं तरी आपसातील वादातून तिने स्वत:च बाटलीत आणलेल्या पेट्रोलनं स्वत:ला पेटवून घेतल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे नेमकं तिला पेटवलं गेलं की तिने स्वत:च पेटवून घेतलं, या बद्दल तपास करणाऱ्या पोलिसांनाही शंका आहे. यात कसून तपास करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. इतर बातम्या - चोरी करण्यासाठी फ्लॅटमध्ये घुसला, दारूची बाटली बघून मन बदललं आणि... पीडित महिलेची गोंधळात टाकणारा जबाब या संपूर्ण प्रकरणाविषयी पीडित महिलेला विचारलं असता, 'पतीचा मला पेटवण्याचा उद्देश नव्हता. हा एक अपघात आहे. आमच्यात सकाळपासून वाद सुरू होता. मी बस स्थानकाजवळ स्कुटीमध्ये पेट्रोल भरत होते. तेव्हा तो आला आणि पुन्हा वाद सुरू झाला. त्यानंतर तो मला म्हणाला की दे मी पेट्रोल गाडीत भरतो. अशात दोघांच्या भांडणात दोघांच्याही अंगावर पेट्रोल सांडलं. त्यानंतर त्याने माचीसची काडी ओढली पण ती माझ्या बाजुला आली आणि त्यावेळी तो घाबरून पळून केला.' पीडितेच्या या जबाबामुळे संपूर्ण प्रकरण गोंधळात आहे. यावर आम्ही सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींची चौकशी करणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्यापासून रात्री उशिरार्पयत तिचा जबाब घेण्याचे काम सुरू होते. तर सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या पीडित महिलेला अधिक उपचारासाठी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात सायंकाळी दाखल केल्यानंतर दीड तास उलटून गेले तरी तिच्या कुटुंबातील एकही सदस्य रुग्णालयाकडे फिरकला देखील नाही. त्यामुळे पोलिसांची संशयाची सुई घरच्यांवरही आहे.
First published:

पुढील बातम्या