प्रेम प्रकरणाबद्दल जाब विचारल्याचा राग, इंजेक्शन देऊन पतीने काढला पत्नीचा काटा

प्रेम प्रकरणाबद्दल जाब विचारल्याचा राग, इंजेक्शन देऊन पतीने काढला पत्नीचा काटा

लग्नानंतर नवरा बाहेरख्यालीपणा करतो हे तिच्या लक्षात आलं होतं. त्याचा रंगेलपणा सुरूच होता. अखेर तिने त्याला जाब विचारला आणि त्याचाच त्याला राग आला.

  • Share this:

हैदराबाद17 जानेवारी : त्या दोघांचं वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं. लग्नानंतरचे नवाळीचे दिवसही संपले नव्हते. ती सुखी संसाराची स्वप्न बघत होती. मात्र एका क्षणात तिची सगळी स्वप्न धुळीस मिळाली. लग्नानंतर नवरा बाहेरख्यालीपणा करतो हे तिच्या लक्षात आलं होतं. तिने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काही ऐकत नव्हता. त्याचा रंगेलपणा सुरूच होता. अखेर तिने त्याला जाब विचारला आणि त्याचा राग येवून त्याने तिला संपविण्याचा निर्णय घेतला.

व्यंकटेश आणि दीपा यांच्या विस्कटलेल्या संसाराची ही कहाणी आहे. या दोघांचं वर्षभरापूर्वी लग्न झालं होतं. ती सुखी संसाराची स्वप्न रंगवत असतानाच व्यंकटेश हा दुसऱ्या तरुणीच्या प्रेमात असल्याचं तिला कळल्याने तिचं सगळं स्वप्नच उद्धस्त झालं. दीपाने नवऱ्याला जाब विचारला. आता आपल्याला ही सोडणार नाही असं वाटल्याने त्याने तिचा काट काढण्याचा निर्णय घेतला.

गतीमंद महिलेवर लैंगिक अत्याचार, संशयिताचा कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न

व्यंकटेश हा एका हॉस्पिटलमध्ये डाटा एण्ट्रीचं काम करतो. त्याला काही औषधांची माहिती होती. एक दिवस तो विषारी औषधाचं इंजेक्शन घेऊन घरी आला. दीपा गाढ झोपल्यावर त्याने दीपाला ते विषारी इंजेक्शन दिलं आणि हत्या केली. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

मुंबईत कॉन्स्टेबलने केला टॅक्सी चालकावर बलात्कार, कारण आहे 'रेड लाईट एरिया'

व्यंकटेशने दीपाला हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय. पण उपचाराआधीच तिचा मृत्यू झाला होता. दीपाच्या कुटुंबीयांनी व्यंकटेशविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलीय. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 16, 2020 07:11 PM IST

ताज्या बातम्या