मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

कल्याण : बेरोजगार पतीचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय, रागाच्या भरात उचललं भयानक पाऊल

कल्याण : बेरोजगार पतीचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय, रागाच्या भरात उचललं भयानक पाऊल

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीवर धारदार चाकूने वार करत तिची हत्या केली.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीवर धारदार चाकूने वार करत तिची हत्या केली.

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीवर धारदार चाकूने वार करत तिची हत्या केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Thane, India
  • Published by:  News18 Desk

विनोद राय, प्रतिनिधी 

मुंबई, 28 सप्टेंबर : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून हत्येच्याही घटना समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी मुंबईतून समोर आली आहे. चारित्र्यावरील संशयाच्या कारणातून पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीवर धारदार चाकूने वार करत तिची हत्या केली. तसेच मध्यस्थी करणाऱ्या शेजाऱ्यावरही वार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईजवळील कल्याणमध्ये घडली आहे. श्वेता शिंदे असे हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर सुनील शिंदे असे आरोपी पतीचे नाव आहे.

सुनील शिंदे आणि त्याची पत्नी श्वेता शिंदे यांच्यात श्वेताच्या चारित्र्यावर संशयावरून गेल्या अनेक महिन्यांपासून भांडण सुरू होते. आरोपी पती बेरोजगार आहे. तर पत्नी श्वेता शिंदे ही भिवंडी महापालिकेत नोकरी करत होती. पत्नी बाहेर काम करायची, त्यामुळे पती रोज पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे, अशी माहिती याप्रकरणातील तपास अधिकारी महेंद्र देशमुख यांनी दिली आहे.

नेहमीप्रमाणे काल सकाळी पुन्हा या दाम्पत्यामध्ये भांडण झाले. यावेळी त्यांच्या शेजारी राहत असलेला संदेश परब या भांडणात मध्यस्थी करायला आला. यावेळी सुनीलने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत त्याला जखमी केले. तसेच यानंतर आपली पत्नी शिल्पावर हल्ला करत तिची हत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी पती सुनील शिंदेला अटक केली आहे.

हेही वाचा - भरधाव दुचाकी महिला वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली, नालासोपाऱ्यातील घटनेचा VIDEO

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याचवेळी बचावासाठी गेलेल्या तरुणावर झालेल्या हल्ल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Kalyan, Murder, Wife and husband