मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

घरातील दारूचा स्टॉक पत्नीने संपवला; पतीचा संताप, सकाळी मृतदेह रिक्षेत भरला अन्...

घरातील दारूचा स्टॉक पत्नीने संपवला; पतीचा संताप, सकाळी मृतदेह रिक्षेत भरला अन्...

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

प्रेमनगर येथील गौसिया मशिदीजवळ राहणारा योगेंद्र तिवारी रिक्षा चालवतो. पाच वर्षांपूर्वी त्याचा इंद्रनगर येथील रहिवासी घनश्याम गुप्ता यांची मुलगी पिंकी गुप्ता (30) हिच्याशी प्रेमविवाह झाला होता.

  • Published by:  News18 Desk
उन्‍नाव, 14 ऑगस्ट : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने घरात ठेवलेली दारू त्याच्या पत्नीने पिऊन घेतली. यानंतर त्याने ती दारू संपूर्ण घरात शोधली. मात्र, त्याला ती दारू मिळाली नाही. यानंतर त्याने आपल्याच पत्नीचा खून करुन टाकला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - ही घटना प्रेमनगर परिसरातील आहे. महिलेने घरात ठेवलेली नवऱ्याची दारू प्यायल्याने रागाच्या भरात पतीने तिला बेदम मारहाण केली. तसेच तिची हत्या केली. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मृतदेह रिक्षात लपवण्यासाठी बाहेर आला असता लोकांनी तो पाहिला आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमनगर येथील गौसिया मशिदीजवळ राहणारा योगेंद्र तिवारी रिक्षा चालवतो. पाच वर्षांपूर्वी त्याचा इंद्रनगर येथील रहिवासी घनश्याम गुप्ता यांची मुलगी पिंकी गुप्ता (30) हिच्याशी प्रेमविवाह झाला होता. शुक्रवारी पिंकीने पतीने घरात ठेवलेली दारू प्यायली. रात्री उशिरा योगेंद्र घरी पोहोचला तेव्हा त्याला दारू मिळाली नाही. पिंकीने सांगितले की, ती ही दारू प्यायली, त्यानंतर त्याने रागाच्या भरातत तिला मारहाण केली आणि भिंतीवर डोके आपटून तिचा निर्घृण खून केला. हेही वाचा - मुलीला फूस लावून पळवून नेलं, कोर्टाकडून अद्दल घडवणारी शिक्षा, भंडारा जिल्हा कोर्टाचा मोठा निर्णय मृतदेहाची विल्हेवाट लावायचे नियोजन - त्यानंतर रात्रभर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे नियोजन केले. सकाळी रिक्षात मृतदेह भरला जाऊ लागल्याने लोकांनी पाहिल्यावर त्याला थांबवले आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपी पतीची चौकशी केली असता त्याने हत्या केल्याचे कबूल केले. दुसरीकडे मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच आई राणी आणि वडील घनश्याम पोहोचले. वडिलांनी त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
First published:

Tags: Crime news, Murder news, Uttar pradesh news

पुढील बातम्या