चारित्र्यावर संशय: पाच वर्षांच्या मुलीसमोरच पतीने गळादाबून केली पत्नीची हत्या

चारित्र्यावर संशय: पाच वर्षांच्या मुलीसमोरच पतीने गळादाबून केली पत्नीची हत्या

वडिल जेलमध्ये आणि आईची हत्या झाल्याने आम्हाला त्या चिमुकल्या लेकराची काळीजी वाटते अशी चिंताही कुटुंबीयांनी व्यक्त केलीय.

  • Share this:

प्रविण तांडेकर, गोंदिया 07 मार्च : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याने आपल्या पाच वर्षीय मुलीसमोरच पत्नीची गळा दाबून हत्या केल्याने खळबळ उडालीय. गोंदिया शहरातील कुडवा इथली ही घटना आहे. गेल्या तीन दिवसात गोंदियात झालेली ही हत्येची ही दुसरी घटना आहे.  सुमन मनोज सावनकर (28 )असे पीडीत महिलेचं नाव आहे. आरोपी मनोज झनकलाल सावनकर हा आपली पत्नी  सुमन  सावनकरच्या चारित्र्यावर संशय घेत असे. त्यावरू वारंवार त्यांचं भांडणही होत होतं अशी माहिती शेजाऱ्यांनी दिलीय.

शुल्लक कारणांवर मनोज हा सुमनला मारहाण करत होता. घटनेच्या दिवशीही त्यांचं भांडण झालं. तो सुमनला मारहाण करत होता. त्यावेळी त्यांची 5 वर्षांची मुलगी तिथेच होती. त्याने मारपीट करून सुमनचं डोकं भिंतीवर आपटले त्यानंतर गळा दाबून हत्या केला. ही घटना लपविण्यासाठी तो तिला स्वत: हॉस्पिटलमध्ये घेवून गेला.

त्यावेळी डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केल्यानंतर आरोपी मनोजने सुमनला पुन्हा घरी आणून मृत अवस्थेत ठेवून घरून पसार झाला होता. मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेवुन आरोपी पतीला अटक केली आहे. या हत्येमागे दुसरं काही कारण आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत. सुमनच्या नातेवाईकांनी मनोज हा तिला कायम त्रास देत होता असा आरोप केलाय. त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणीही त्यांनी केलीय.

हे वाचा - संबंधासाठी नकार दिल्याने तरुणाने केली हत्या, ती बहीण असल्याचं लक्षात येताच...

त्यांच्या रागामुळे आमची मुलगी गेली आणि चिमुकली 5 वर्षांची मुलगी पोरकी झाली. तिच्या आयुष्याचा प्रश्न आता निर्माण झालाय, वडिल जेलमध्ये आणि आईची हत्या झाल्याने आम्हाला त्या चिमुकल्या लेकराची काळीजी वाटते अशी चिंताही कुटुंबीयांनी व्यक्त केलीय.

हेही वाचा -

हुंड्यात बुलेट न दिल्यानं चार मित्रांकडून पत्नीवर गँगरेप, पतीनेच शूट केला VIDEO

लग्नात डान्स करत होती 13 वर्षांची मुलगी, चॉकलेटचं आमिष दाखवत केला बलात्कार

 

 

First published: March 7, 2020, 10:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading