मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बायकोने दारू प्यायला पैसे दिले नाही, दारुड्या नवऱ्याने केलं संतापजनक कृत्य

बायकोने दारू प्यायला पैसे दिले नाही, दारुड्या नवऱ्याने केलं संतापजनक कृत्य

आरोपी पती

आरोपी पती

सोमवारी रात्री आरोपी पतीने पत्नी प्याजोबाई हिला बेदम मारहाण केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Chhattisgarh, India
  • Published by:  News18 Desk

सुरजपुर, 31 ऑगस्ट : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. छत्तीसगडमधील सूरजपूर जिल्ह्यात एका व्यक्तीने आपल्याच पत्नीची हत्या केली. आरोपी पतीला पत्नीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सूरजपूरमधील गेत्रा गावात घडली आहे. पतीने पत्नीचा पायाने निर्घृणपणे खून केल्याची माहिती आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

आरोपी पतीला दारूची सवय आहे. त्यामुळे त्याने आपल्या बायकोला दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. मात्र, त्याला त्याच्या बायकोने दारू प्यायला पैसे दिले नाही. त्याला नकार दिला. यानंतर यावरुन दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर आरोपीने रागाच्या भरात पत्नीचा खून केला. सुरजपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री घडली.

सोमवारी रात्री आरोपी पतीने पत्नी प्याजोबाई हिला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिचा खून केला. मंगळवारी सकाळी सव्वातीनच्या सुमारास आजूबाजूच्या लोकांना या घटनेची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपी पती वेद सिंहची चौकशी केली. चौकशीत पतीने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. यानतंर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली.

गावातील तरुणाने दिली माहिती -

विशेष म्हणजे मृत प्याजो बाईच्या पुतण्याला गावातील एका तरुणाने 30 ऑगस्टला सकाळी घरात येऊन माहिती दिली. तुझे काका-काकू मध्यरात्री जोरदार भांडण करत होते. असे त्या युवकाने सांगितले. यानंतर प्याजो बाईच्या पुतण्याने त्याठिकाणी धाव घेतली. तर त्याला त्याची काकू प्याजो बाई मृतावस्थेत आढळली. तसेच त्याचा काका हा दुसऱ्या घरात झोपलेला होता. यानंतर त्याने गावातील सरपंच आणि अन्य लोकांना याबाबत सांगितले.

हेही वाचा - मुस्लीम पत्नीने जबरदस्तीने गोमांस खाऊ घातल्याने हिंदू पतीची आत्महत्या, आता पोलिसांनी उचललं मोठं पाऊल 

याप्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याने आपला गुन्हाही कबूल केला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Chhattisgarh, Crime news, Murder