घृणास्पद! पतीने मित्रांच्या मदतीने पत्नीचं केलं अपहरण; तिला दारू पाजून केला सामूहिक बलात्कार

घृणास्पद! पतीने मित्रांच्या मदतीने पत्नीचं केलं अपहरण; तिला दारू पाजून केला सामूहिक बलात्कार

आरोपी पतीने (Accused Husband) आपल्या मित्रांच्या मदतीने (With Friends) आपल्याच पत्नीचं अपहरण (Kidnapped Wife) करून तिला शहरातील एका हॉटेलमध्ये कोंडून ठेवंल होतं. त्यानंतर नराधम पतीने मित्रांच्या मदतीने पत्नीला दारू पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gang rape) केला आहे.

  • Share this:

कोटा, 02 फेब्रुवारी: पत्नीच्या अपहरणाची आणि सामुहिक बलात्काराची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी पतीने (Husband) आपल्या मित्रांच्या (Friends) मदतीने आपल्याच पत्नीचं अपहरण (kidnapped wife) करून तिला शहरातील एका हॉटेलमध्ये कोंडून ठेवंल होतं. त्यानंतर नराधम पतीने मित्रांच्या मदतीने पत्नीला दारू पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gang rape) केल्याचा आरोप या इसमावर करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती आणि अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला कोटा जिल्ह्याच्या शेजारी असणारा जिल्हा बूंदी याठिकाणची रहिवासी आहे. तर आरोपी पती कोटा जिल्ह्यातील महावीरनगर येथील रहिवासी आहे. त्याने पीडित महिलेला फसवून तिच्याशी 2016 मध्ये लग्न केलं होतं. पण लग्नानंतर पतीचं अगोदरचं लग्न झाल्याचं पीडित महिलेला कळालं. त्यामुळे त्यांच्या दोघांत वारंवार विवाद होत होता.

(हे वाचा-रात्री उशिरापर्यंत 2 मुलींसह महिलेला पोलीस ठाण्यात बसवणे पोलिसांना भोवले)

पीडितेने केलेल्या आरोपानुसार, ती महिला खरेदी करण्यासाठी कोटा शहरात आली होती. त्यावेळी ती विज्ञान नगर येथील एका फ्लायओव्हर खाली उभी होती. त्यावेळी आरोपी पतीने तिचं अपहरण करून तिला कारमध्ये बसवलं. पण कारमध्ये अगोदरच त्याचे दोन मित्र बसले होते. यावेळी आरोपी पतिने एका मित्राची ओळख वकील तर दुसऱ्याची ओळख मॅजिस्ट्रेट म्हणून करून दिली. दोघांत सुरू असलेला वाद आणि नातं मिटवण्याची धमकीही पतीने यावेळी दिली.

या तिन्ही आरोपींनी पीडित महिलेवर कारमध्येच जोर जबरदस्ती करायला सुरुवात केली. यांच्या तावडीतून सुटण्यासाठी पीडितेने आरडा ओरडा करण्याचा प्रयत्न केला, पण आरोपी पतीने कारमधील गाण्यांचा आवाज वाढवला. याच अवस्थेत पीडित महिलेला आरोपींनी शहरात दोन तास फिरवलं. त्यानंतर तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. त्यांनी अगोदरच याठिकाणी दोन रुम्स बुक करून ठेवल्या होत्या. येथे आरोपी पतीने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने पीडितेला दारू पाजली आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार केला.

(हे वाचा-बादल यांच्या गाडीवर हल्ल्याचा VIDEO आला समोर; कार्यकर्त्यांवर गोळ्याही झाडल्या)

या घटनेनंतर पीडित महिला बदनामीच्या भीतीने काही दिवस गप्प राहिली. त्यानंतर तिने हिम्मत एकवटून विज्ञान नगर येथील पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला पोलीस ठाण्यात बोलावून प्रकरण मिटवलं. या शिक्षेनं नाखूश असणाऱ्या पीडित महिलेनं शहरातील एसपी समोर आपली तक्रार मांडली. त्यांनतर विज्ञान नगर पोलीस ठाण्यात आरोपी पतिसहीत अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

Published by: News18 Desk
First published: February 2, 2021, 4:47 PM IST

ताज्या बातम्या