Home /News /crime /

अमानूष! घटस्फोट मिळण्यासाठी क्रूरतेचा कळस, गर्भवती पत्नीला टोचलं HIVचं इंजेक्शन

अमानूष! घटस्फोट मिळण्यासाठी क्रूरतेचा कळस, गर्भवती पत्नीला टोचलं HIVचं इंजेक्शन

आपली गर्भवती पत्नी (Pregnant wife) घटस्फोटासाठी (Divorce) तयार होत नसल्यामुळे पतीने (Husband) तिला एचआयव्हीचं इंजेक्शन (HIV Injection) टोचल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

    लखनऊ, 12 सप्टेंबर : आपली गर्भवती पत्नी (Pregnant wife) घटस्फोटासाठी (Divorce) तयार होत नसल्यामुळे पतीने (Husband) तिला एचआयव्हीचं इंजेक्शन (HIV Injection) टोचल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. विवाहबाह्य संबंध (Extra marital affair) असणाऱ्या पतीने आपल्या पत्नीपासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी हे अमानूष पाऊल उचललं. पत्नीच्या वतीनं या प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पतीचा शोध घेत आहेत. लग्नानंतर मतभेद उत्तर प्रदेशमधील अलिगड परिसरात राहणाऱ्या तरुणीचं लग्न रामघाट रोड परिसरातील एका आरोग्य कर्मचाऱ्याशी झालं होतं. 7 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या या लग्नात त्यानं पत्नीच्या कुटुंबीयांकडून 12 लाख रुपये रोख आणि 25 लाख रुपये दागिने आणि इतर स्वरुपात असा हुंडा घेतला होता. मात्र लग्नानंतर काही दिवसातच त्याचे आणि पत्नीचे मतभेद व्हायला सुरुवात झाली. विवाहबाह्य संबंध आपल्या पतीचे त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका आरोग्य कर्मचाऱ्यासोबत लैंगिक संबंध असल्याची बाब पत्नीला समजली. याबाबत पतीला जाब विचारल्यानंतर त्यांच्यात भांडणं व्हायला सुरुवात झाली. काही दिवसांनी सातत्याने ही भांडणं होऊ लागली आणि पतीने पत्नीला घटस्फोट देण्याची मागणी केली. मात्र त्यावेळी पत्नीच्या आईवडिलांनी दोघांची समजूत काढून प्रकरण शांत केलं होतं. घटस्फोटासाठी दबाव काही दिवसांपासूर्वी पत्नी गर्भवती असल्याचं समजल्यावरही तिचा छळ पतीने आणि सासरच्यांनी सुरुच ठेवला. तुमची मुलगी सतत आजारी पडत असल्यामुळे आपल्याला तिच्यापासून घटस्फोट हवा असल्याचं पतीनं सांगितलं. मात्र ती गर्भवती असल्यामुळे अधूनमधून आजारी पडत असेल, अशी समजूत तिच्या आईवडिलांनी घातली. त्यानंतर एक दिवस पतीनं एचआयव्हीचं इंजेक्शनच पत्नीला दिलं. यामुळे तिला आणि तिच्या होणाऱ्या बाळालादेखील याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली. हे वाचा - आता आधारप्रमाणे मिळणार यूनिक हेल्थ कार्ड, उपचाराचीही होणार नोंद पोलिसांत तक्रार या प्रकाराने धक्का बसलेल्या पत्नीने वडिलांच्या मदतीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी महिलेचा पती आणि सासरच्यांविरोधात तक्रार दाखल करून घेतली असून ते पतीचा शोध घेत आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Uttar pardesh, Wife and husband

    पुढील बातम्या