Home /News /crime /

न विचारता नवा मोबाईल घेतल्याने पतीने दिली पत्नीच्या हत्येची सुपारी; हल्लेखोर आले अन्.., वाचा पुढे काय घडलं

न विचारता नवा मोबाईल घेतल्याने पतीने दिली पत्नीच्या हत्येची सुपारी; हल्लेखोर आले अन्.., वाचा पुढे काय घडलं

महिलेनं काही महिन्यांपूर्वीच आपल्या पतीजवळ आपल्या मोबाईल खरेदी कऱण्याची इच्छा असल्याचं म्हटलं होतं. मात्र, पतीने फोन घेऊन देण्यास नकार दिला होता.

    कोलकाता 28 जानेवारी : कोलकातामधील एका महिलेनं आपल्या पतीची परवानगी न घेता मोबाईल खरेदी केला. या गोष्टीचा तिच्या पतीला इतका राग आला की त्याने पत्नीच्या हत्येचीच सुपारी दिली (Husband Gave Contract to Kill Wife). प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पतीची इच्छा नव्हती की त्याच्या पत्नीने मोबाईल खरेदी करावा. मात्र, पत्नीने त्याला न विचारता मोबाईल खरेदी केल्याने तो भडकला आणि पत्नीच्या हत्येची सुपारी दिली. अनोळखी तरुणासोबत डेटवर गेली अन् तिथेच झाला मृत्यू; तरुणीसोबत घडलं विपरित हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, ही घटना कोलकाताच्या नरेंद्रपूर परिसरातील आहे. पोलिसांनी आरोपी पती आणि सुपारी किलर (Contract Killer) या दोघांनाही अटक केली आहे. महिलेनं काही महिन्यांपूर्वीच आपल्या पतीजवळ आपल्या मोबाईल खरेदी कऱण्याची इच्छा असल्याचं म्हटलं होतं. मात्र, पतीने फोन घेऊन देण्यास नकार दिला होता. यानंतर महिलेनं स्वतःच फोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. तिने मुलांचे ट्यूशन घेऊन पैसे जमा केले आणि एक फोन खरेदी केला. महिलेनं काही दिवसांआधीच पतीला न सांगताच फोन खरेदी करून आणला. पतीला याबाबत समजताच तो रागवला आणि त्याने पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली. इतकंच नाही तर त्याने पत्नीच्या हत्येसाठी सुपारीही दिली. आरोपीनं एका किलरला आपल्या पत्नीच्या हत्येसाठी पैसे दिले. यानंतर किलरने त्या व्यक्तीच्या पत्नीवर हल्ला केला. मात्र सुदैवाने यात तिचा जीव वाचला. 'भाई' का म्हटला नाही? कुत्र्यासारखे बिस्कीट खायला लावून तरुणाला मारहाण, VIDEO गुरुवारी रात्री महिलेवर दोन अज्ञातांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. मात्र, तिचा जीव वाचला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि महिलेला गंभीर अवस्थेतच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनी हल्ला कऱणारा व्यक्ती आणि महिलेच्या पतीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुसरा हल्लेखोर फरार झाला आहे. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Kolkata, Mobile Phone, Murder

    पुढील बातम्या