Home /News /crime /

प्रेयसीच्या घरात रंगेहाथ सापडला पती; भररस्त्यात आणून असा हाणला असा हाणला की..

प्रेयसीच्या घरात रंगेहाथ सापडला पती; भररस्त्यात आणून असा हाणला असा हाणला की..

यावेळी बघणाऱ्यांनी या घटनेचा व्हिडीओ शूट केला.

    उत्तर प्रदेश, 3 ऑक्टोबर : एका महिलेचा पती आपल्या प्रेयसीला तिच्या फ्लॅटवर भेटायला गेला होता. त्याच्या पत्नीनेही त्याचा पाठलाग केला व तिही पोहोचली महिलेच्या घरी. त्यानंतर मात्र जो काही प्रकार झाला तो तुम्हाला या फोटोवरुन दिसतच असेल. या महिलेला पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय आला होता. त्यात त्याचा पाठलाग करताना तिही त्याच्या प्रेयसीच्या घरी पोहोचली. तिने पतीची कॉलर पकडून त्याला रस्त्यावर आणलं आणि धू धू धुतला. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यातील आहे. पीलीभीतमध्ये भररस्त्यात आपल्या पतीला बेदम मारलं. ज्याचा व्हिडीओ घटनास्थळावरील लोकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पीडित महिलेकडून मिळालेल्या तक्रारीनंतर तपास सुरू केला आहे. त्याचं झालं असं महिलेचा पती गेल्या अनेक दिवसांपासून प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी ये-जा करीत होता. त्याचा पाठलाग करीत शुक्रवारी त्याची पत्नीही पीलीभीतला पोहोचली आणि आपल्या आरोपी पत्नीला प्रेयसीच्या घरातून खेचून बाहेर काढलं. भररस्त्यात त्याला मारहाण सुरू केली. हे ही वाचा-आंतरजातीय विवाहानंतर पहिल्यांदा माहेरी आली मुलगी; बापाची आत्महत्या याचा व्हिडीओ तेथील लोकांनी शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये रचना मिश्रा आपल्या पतीला प्रेयसीच्या घराच्या बाहेर उभं राहून आरडा-ओरडा करीत आहे. आणि पतीवर धावून जात आहे. रचना मिश्राने सांगितले की, तिचं लग्न 10 वर्षांपूर्वी लखनऊचे अधिवक्ता अमोघ मिश्रासोबत झालं होतं. जो तिला मारहाण करीत होता व जीवे मारण्याची धमकी देत होता. त्यानंतर पीडिता दोन ते तीन दिवसांपूर्वी पीलीभीतमध्ये आपल्या माहेरी आली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या