मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

लेस्बियन पत्नीसोबत शरीर संबंधासाठी पतीची जबरदस्ती; पत्नीने दिली भयंकर शिक्षा!

लेस्बियन पत्नीसोबत शरीर संबंधासाठी पतीची जबरदस्ती; पत्नीने दिली भयंकर शिक्षा!

दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीचे हात-पाय एका प्लास्टिक बॅगेत मिळाले होते.

दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीचे हात-पाय एका प्लास्टिक बॅगेत मिळाले होते.

दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीचे हात-पाय एका प्लास्टिक बॅगेत मिळाले होते.

  • Published by:  Meenal Gangurde

जोधपुर, 22 फेब्रुवारी : राजस्थानमधील (Rajasthan) जोधपुर (Jodhpur) शहरातील सीवरेज ट्रीटमेंट प्लान्टमध्ये तीन दिवसांपूर्वी मानवी शरीराचे अवयव सापडले होते. (Human body organ) या प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. कृषी विभागातील एएओ मेडता सिटी निवासी चरणसिंह उर्फ सुशील जाटची हत्या केली. (Murder) यामध्ये मृत व्यक्तीची पत्नी सीमाने आपल्या दोन बहिणी आणि एका मित्राचा समावेश आहे.

हत्या करून इलेक्ट्रिक कटरने (Electric cutter) मृतदेहाचे तुकडे करून ते सीवरेज ट्रीटमेंट प्लान्टमध्ये टाकण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणात तीन बहिणी (Sisters) आणि एका मित्राला अटक केली आहे. पतीची फक्त एवढीच चूक होती की, तो आपल्या पत्नीसोबत वैवाहिक संबंध ठेवण्यासाठी दबाव करीत होता. मात्र पत्नी समलैंगिक असल्याकारणाने ती पतीसह शारिरीक संबंध ठेवू इच्छित नव्हती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदडी सीवरेज प्लान्टमध्ये दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीचे हात-पाय एका प्लास्टिक बॅगेत मिळाले होते. प्लास्टिक बॅगवर छापलेल्या दुकानाच्या नावाच्या आधारावर दुकानदाराची चौकशी केली. त्यानंतर मेडता सिटीजवळील खाकडकी निवासी सुशील चौधरी असल्याचं समोर आलं आहे. तपासादरम्यान पत्नीवर शंका निर्माण झाली होती. मृत व्यक्तीचं 2013 मध्ये सीमासोबत लग्न झालं होतं. तिला पोलिसी खाक्या दाखवतान पत्नीने आपला गुन्हा कबुल केला.

हे ही वाचा-धक्कादायक! गणिताच्या पेपरच्या 2 दिवस आधी शिक्षकानेच केली विद्यार्थिनीची हत्या

डॉग स्क्वॉड आणि एफएसएळ टीमने केला तपास..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदडी गोशाळेच्या मागे एसटीएफ प्लान्ट (सीवरेज प्लॉन्ट) जल एका व्यक्तीचा मृतदेह तुकड्यांमध्ये पाहायला मिळाला. या व्यक्तीचे हात, पाय आणि डोकं कापलेल्या अवस्थेत मिळाल्याची सूचना मिळाली होती. पोलिसांनी डॉग स्क्वॉडला बोलावून घटनास्थळीचं निरीक्षण केलं.

पोलीस तपासात समोर आलेला किस्सा थक्क करणारा आहे. डीसीपी धर्मेंद्र सिंह यादव यांनी सांगितले की, मृताची पत्नी आणि दोन मेहुणे आणि एका मेव्हणीच्या मित्राने मिळून तरुणाची हत्या केली. मृताची पत्नी समलैंगिक असून तिचे दुस-या महिलेशी संबंध होते, या कारणावरून तरुण आणि त्याच्या पत्नीमध्ये तेढ निर्माण झाली होती. या भांडणामुळे पत्नीने बहिणींसह पतीची हत्या केली.

First published:

Tags: Crime news, Murder, Rajasthan