मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

ज्या दिरासोबत केले लग्न, त्यानेच क्षुल्लक कारणावरुन झाडली गोळी अन्...

ज्या दिरासोबत केले लग्न, त्यानेच क्षुल्लक कारणावरुन झाडली गोळी अन्...

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

विजय उर्फ ​​देवा सोनीपतच्या गांधी नगरमध्ये पत्नी सोनिया (32) आणि चार मुलांसह भाड्याने राहतो. रात्री उशिरा घरी आल्यावर त्याचा आपल्या पत्नीशी काही कारणावरुन वाद झाला.

  • Published by:  News18 Desk
सोनीपत, 13 ऑगस्ट : देशात दिवसेदिवस बलात्कार, अत्याचार तसेच हत्येच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. आता हरयाणा राज्यातून आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हरियाणातील सोनपत येथे घरगुती वादातून पतीने पत्नीच्या छातीत गोळी झाडली आणि नंतर घटनास्थळावरून पळ काढला. गोळ्यांचा आवाज ऐकून शेजारील महिलेने घरमालकाला याची माहिती दिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - ज्या दिराशी लग्न केलं त्यानेच किरकोळ वादातून आपल्या पत्नीची हत्या केली आहे. याबाबत घरमालकाला माहित झाल्यावर त्यांनी पोलिसांना आणि महिलेच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर जखमी महिलेला गन्नौर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा कलान येथील रहिवासी असलेला विजय उर्फ ​​देवा सोनीपतच्या गांधी नगरमध्ये पत्नी सोनिया (32) आणि चार मुलांसह भाड्याने राहतो. रात्री उशिरा घरी आल्यावर त्याचा आपल्या पत्नीशी काही कारणावरुन वाद झाला. यादरम्यान विजयने पत्नी सोनिया हिच्या छातीत गोळी झाडली. यानंतर ती गंभीर जखमी झाली. तर घटनेनंतर आरोपीने शस्त्र घेऊन पळ काढला. गोळ्यांचा आवाज ऐकून शेजारची भाडेकरू महिला त्यांच्या घरी गेली. रक्ताने माखलेल्या अवस्थेत सोनियाला पाहून तिला धक्काच बसला. यानंतर त्यांनी तत्काळ घरमालकाला याबाबतची माहिती दिली. गन्नौर पोलीस ठाण्याचे प्रभारी धीरज कुमार यांनी सांगितले की, माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. महिलेला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिचा मृत्यू झाला. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. महिलेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. हेही वाचा - पित्याचा तीन महिन्यांपूर्वी मृत्यू, आता मुलीवर बलात्कार आणि रेल्वे रूळावर आढळला मृतदेह महिलेचं दिराशी झालं होतं लग्न -  दुसरीकडे, महिलेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांच्या मुलीचे सोनू उर्फ ​​अजयसोबत लग्न झाले होते. अजयसोबत सोनियांना तीन मुले आहेत. अजयचा सात वर्षांपूर्वी रस्ता अपघातात मृत्यू झाला. सोनियाचे घर पुन्हा वसवण्यासाठी त्यांनी अजयचा धाकटा भाऊ विजय उर्फ ​​देवासोबत लग्न केले होते. विजयसोबत लग्न केल्यानंतर तिला एक मुलगी झाली. क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. पण विजय तिला मारणार हे त्याला माहीत नव्हते, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली.
First published:

Tags: Crime news, Haryana, Murder

पुढील बातम्या