Home /News /crime /

अजबच! "माझी पत्नी महिला नाही तर पुरुष"; पतीची थेट सुप्रीम कोर्टात धाव; फसवणुकीची केस केली दाखल

अजबच! "माझी पत्नी महिला नाही तर पुरुष"; पतीची थेट सुप्रीम कोर्टात धाव; फसवणुकीची केस केली दाखल

एका पतीनं (Husband) आपली पत्नी ही स्त्री नसून, पुरुष (Male) असल्याचा दावा करून आपली फसवणूक झाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

    नवी दिल्ली, 12 मार्च:  बाह्यरूप पुरुषाचं, मात्र मन-भावना स्त्रीचं, अशी परिस्थिती असेल, तर लिंगबदल शस्त्रक्रिया करून स्त्रीरूप धारण करण्यासारख्या अशा गोष्टी पूर्वीच्या तुलनेत अधिक सहजतेने घडत आहेत. अलीकडे अशा व्यक्तींना समाजात स्वीकारलं जात आहे. समलिंगी विवाहांनाही हळूहळू सामाजिक मान्यता मिळत आहे. त्याच वेळी या सदर्भातलं एक धक्कादायक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल झालं आहे. एका पतीनं (Husband) आपली पत्नी  ही स्त्री नसून, पुरुष (Male) असल्याचा दावा करून आपली फसवणूक झाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (11 मार्च) या याचिकेवर सुनावणी घेतली आणि कथित पत्नीला पुरुषाचं गुप्तांग (Male Genital) असताना फसवणूक करून स्त्री म्हणून एका पुरुषाशी विवाह करून त्याची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी खटला चालवावा, असा निर्णय दिला आहे. 'एशियानेट न्यूज'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मे 2019 मध्ये हे प्रकरण ग्वाल्हेरच्या दंडाधिकाऱ्यांसमोर आलं होतं. पतीनं आपल्या पत्नीवर फसवणूक केल्याचा आरोप करून तक्रार दाखल केली होती. त्याची दखल दंडाधिकाऱ्यांनी घेतली होती. 2016मध्ये या जोडप्याचा विवाह झाला; मात्र लग्नानंतर लगेचच पतीच्या लक्षात आलं, की त्याची पत्नी ही स्त्री नसून पुरुष आहे. तिला पुरुषाचं गुप्तांग आहे. त्यामुळे त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित होऊ शकत नाहीत. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पतीनं ऑगस्ट 2017मध्ये पत्नी आणि तिच्या वडिलांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यासाठी दंडाधिकाऱ्यांकडे (Magistrate) धाव घेतली होती. दंडाधिकाऱ्यांनी या आरोपाची दखल घेऊन पत्नीविरुद्ध नोटीस जारी केली होती; मात्र जून 2021मध्ये हे प्रकरण मध्य प्रदेश उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आलं असताना न्यायालयानं दंडाधिकाऱ्यांचा निर्णय रद्दबातल केला. भयावह! देवळासमोर रक्ताने माखलेली आई, अन् तिच्या हातात बाबांचं कापलेलं डोकं त्यावर पीडित पतीने आपले वकील एन. के. मोदी (NK Modi) यांच्या मदतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी करण्यास नाराजी व्यक्त केली होती. परंतु न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि एम. एम. सुंदरेश यांच्या खंडपीठाने (Bench) आरोपी पत्नीकडून उत्तर मागितलं होतं. तेव्हा पीडित पतीने पत्नीचा वैद्यकीय अहवाल न्यायालयासमोर सादर केला. त्यात त्याच्या पत्नीला पुरुषाचे जननेंद्रिय आणि अविकसित हायमेन (penis and an imperforate hymen) असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. अविकसित हायमेन हा एक जन्मजात विकार (congenital disorder) आहे. त्यामुळे योनीमार्गात अडथळा निर्माण होतो. यावर तक्रारदाराची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील एन. के. मोदी यांनी खंडपीठाला सांगितलं, की 'या पुराव्यांवरून तक्रारदाराची पत्नी पुरुष असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे त्यांनी फसवणूक केल्याचं सिद्ध होत असून, भारतीय दंड संहितेच्या कलम 420 अंतर्गत हा फौजदारी गुन्हा आहे.' भयंकर! सपा नेत्यासह पत्नीची क्रूरपणे हत्या; घरातच पुरले मृतदेह दुसरीकडे पत्नीनेही पतीविरोधात हुंड्यासाठी (Dowry) छळाची तक्रार दाखल केली होती. कौटुंबिक समुपदेशन केंद्रात तक्रार दाखल करताना तिने पतीने आपल्याला क्रूर वागणूक दिल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, महिलेची ग्वाल्हेर इथल्या रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसंच पती आणि त्याच्या बहिणीचे जबाब न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवण्यात आले. त्यानंतर पत्नीला नोटीस पाठवण्यात आली. याविरोधात पत्नीने मध्य प्रदेश उच्च न्यायालयात धाव घेतली होती; मात्र सर्वोच्च न्यायालयाने तक्रारदार पतीची बाजू समजून घेऊन त्याच्या याचिकेवर सुनावणी घेतली आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यास हरकत नसल्याचं स्पष्ट केलं.
    First published:

    Tags: Crime news, Online fraud, Supreme court

    पुढील बातम्या