मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

नवविवाहित पत्नीनं सेल्फी काढताना दिला धक्का; पती तिसऱ्या मजल्यावरून कोसळला, शुद्धीवर येताच समजलं सत्य

नवविवाहित पत्नीनं सेल्फी काढताना दिला धक्का; पती तिसऱ्या मजल्यावरून कोसळला, शुद्धीवर येताच समजलं सत्य

सेल्फी काढत असताना पत्नीनं धक्का दिल्यामुळे पती तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला. 12 दिवसांनंतर शुद्धीवर आलेल्या पतीला सत्य समजलं तेव्हा धक्काच बसला.

  • Published by:  desk news

भोपाळ, 4 जुलै: सेल्फी (Selfie) काढण्याचा हट्ट केल्यामुळे नुकतंच लग्न झालेला तरुण (Newly married) तिसऱ्या मजल्यावरील गच्चीच्या कठड्यावर (Roof top) उभा राहिला. सेल्फी घेत असतानाच पत्नीनं त्याला एक जोरदार धक्का (Pushed down) दिला. या धक्क्यातून तरुणाने कसंबसं स्वतःला वाचवलं. पत्नी आपली गंमत करतेय, असं त्याला वाटलं. मात्र पत्नीनं धक्के देणं सुरूच ठेवलं. पत्नीनं दिलेल्या आणखी एका जोरदार धक्क्याने मात्र तो स्वतःला सावरू शकला नाही आणि तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली कोसळला. ही घटना घडली मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये (Bhopal).

12 दिवस बेशुद्ध

या घटनेनंतर तरुणाला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. 12 दिवस हा तरुण बेशुद्ध होता. शुद्धीत आल्यावर त्याला समजलं रुग्णालयात दाखल झाल्याच्या पाचव्या दिवशी पत्नी माहेरी निघून गेली होती. पत्नीनं जाणीवपूर्वक आपल्याला ढकलून दिल्याचं या तरुणाच्या लक्षात आलं आणि त्यानं पत्नीविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. सध्या पोलीस पत्नीचा शोध घेत असून अद्याप ती कुठे आहे, याचा शोध लागला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

हे वाचा -पोलिसांना बघताच आरोपीनं चौथ्या मजल्यावरून मारली उडी; ठाण्यातील थरारक घटना

अशी घटली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद सैनी असं जखमी झालेल्या 27 वर्षांच्या तरुणाचं नाव आहे. त्याचं 20 दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. पत्नी, आईवडिल आणि छोटा भाऊ असं एकत्र कुटुंब भोपाळमधील प्रोफेसर कॉलनीत राहात होतं. धर्मेंदची पत्नी सुमननं सेल्फी काढण्याच्या बहाण्यानं धर्मेंदला छतावर बोलावलं आणि त्याला खाली ढकलून दिलं. याच परिसरात राहणाऱ्या शिवम नावाच्या एका नातेवाईकानं धर्मेंद्र खाली कोसळल्याचं पाहिलं आणि तातडीनं त्याला रुग्णालयात दाखल केलं. धर्मेंद्रला हात, पाय आणि जबडा यांना फ्रॅक्चर असून अंगावर अनेक जखमा आहेत. 12 दिवस बेशुद्ध राहिलेल्या धर्मेंद्रला शुद्ध आल्यानंतर परिस्थितीची जाणीव झाली आणि अशा अवस्थेत पत्नी निघून गेल्याचं समजल्यानंतर त्याचा संशय बळावला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Bhopal News, Madhya pradesh