मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

7 जन्माच्या गाठी एका झटक्यात तुटल्या, रागात पतीनं डोक्यात वरवंटा घातला आणि....

7 जन्माच्या गाठी एका झटक्यात तुटल्या, रागात पतीनं डोक्यात वरवंटा घातला आणि....

सात जन्माचं नात काही मिनिटांत कायमचं संपलं. ही धक्कादायक घटना पन्हाळा तालुक्यातील दरेवाडी भागात घडली आहे.

    कोल्हापूर : लग्नात सात जन्म एकत्र राहण्याचं वचन घेतलं जातं. एकमेकांची साथ एका छोट्याशा कारणावरून सोडली आहे. छोट्या कारणातून वादाची ठिणगी पडली आणि होत्याचं नव्हतं झाली. सात जन्माचं नात काही मिनिटांत कायमचं संपलं. ही धक्कादायक घटना पन्हाळा तालुक्यातील दरेवाडी भागात घडली आहे. सोमवारी रात्री उशिरा पत्नीसोबत किरकोळ कारणातून वाद झाला. या वादाची ठिणगी पडली आणि वाद विकोपाला पोहोचला. त्याच रागातून पतीनं पत्नीच्या डोक्यात वरवंटा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली. रागावरील नियंत्रण सुटलं आणि घात झाला. हातात वरंवटा मिळाला आणि तोच पत्नीच्या डोक्यात घालून तिला संपवण्यात आलं. पतीनं आपल्यावर हल्ला केल्याचा धक्का पत्नीला सहन झाला नाही. हा वरवंटा जोरात बसल्याने रक्तप्रवाह देखील होत होता. त्यामुळे पत्नीचा जागीच मृत्यू झाला. अनिता जाधव असं मृत महिलेचं नाव आहे. या घटनेची फिर्याद मुलगा तेजसने पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. पन्हाळा पोलिसांनी संशयित आरोपी बाबासो जाधव यांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सध्या चौकशी सुरू आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Crime news, Kolhapur

    पुढील बातम्या