Home /News /crime /

बापरे! अंगावर येऊन बसली 101 किलोची पत्नी, पतीचा जागीच मृत्यू

बापरे! अंगावर येऊन बसली 101 किलोची पत्नी, पतीचा जागीच मृत्यू

Representative Image

Representative Image

101 किलो वजन असणारी पत्नी अंगावर बसल्यानं पतीचा मृत्यू (Husband Died) झाला आहे. ही घटना तेव्हा घडली जेव्हा पत्नीनं दारु (Alcohol) प्यायली होती आणि ती पूर्णपणे नशेत होती.

    मॉसकाव 20 मे : नशेत आपण करत असलेल्या कृत्याची जाणीव न झाल्यानं अनेकांच्या हातून कळत-नकळत काही गुन्हे (Crime) घडत असतात. असंच आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. या घटनेमध्ये 101 किलो वजन असणारी पत्नी अंगावर बसल्यानं पतीचा मृत्यू (Husband Died) झाला आहे. ही घटना तेव्हा घडली जेव्हा पत्नीनं दारु (Alcohol) प्यायली होती आणि ती पूर्णपणे नशेत होती. ही घटना रशियामध्ये घडली आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, हे प्रकरण रुसमधील एका शहरातील आहे. इथे पती आणि पत्नीमध्ये कुठल्या तरी गोष्टीवरुन सुरुवातीला थोडा वाद झाला आणि हा वाद वाढत गेला. यादरम्यान पत्नी नशेत होती. पत्नीनं पतीला माफी मागण्यास सांगितलं. मात्र, त्यानं माफी न मागितल्यानं पत्नीला राग अनावर झाला आणि रागात ती आपल्या पतीच्या तोंडावर बसली. रिपोर्टनुसार, पत्नीचं वजन 101 किलो होतं. ती आपल्या पतीच्या अंगावर बसताच त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. मात्र, पत्नी आपल्या पतीच्या अंगावर तेव्हापर्यंत बसून राहिली, जोपर्यंत त्याचा श्वास बंद झाला नाही. दोघांची मुलगी तिथेच उपस्थित होती. तिनं हे सर्व पाहाताच शेजाऱ्यांनी बोलावून आणलं. मात्र, तोपर्यंत पतीचा मृत्यू झाला होता. काही वेळानंतर या महिलेला समजलं, की खरंच तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे. शेजाऱ्यांना ही गोष्ट माहिती होताच महिलेच्या घरी एकच गर्दी जमली. महिलेनं म्हटलं, की तिला आपल्या पतीला मारायचं नव्हतं. मात्र, तो खूप बोलत असल्यानं त्याला शांत करायचं होतं. सुरुवातीला महिला खरं बोलण्यास तयार नव्हती, मात्र मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. सध्या याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Murder news

    पुढील बातम्या