एका सिमकार्डसाठी तोडलं सात जन्माचं नातं, 23 वर्षीय तरुणीनं उचललं धक्कादायक पाऊल

एका सिमकार्डसाठी तोडलं सात जन्माचं नातं, 23 वर्षीय तरुणीनं उचललं धक्कादायक पाऊल

पत्नी हट्टाला पेटल्यानं दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. काही वेळानं पती सामान घेण्यासाठी घराबाहेर पडला तेव्हा रागाच्या भरात पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

  • Share this:

करनाल, 03 डिसेंबर : सात जन्माचं नातं एका सिमकार्डसाठी तोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मजूर असलेल्या तरुणानं आपल्या 23 वर्षीय पत्नीला सिमकार्ड घेऊन देण्यासाठी नकार दिल्यानंतर पत्नीनं पतीसोबतचं सात जन्माचं नातं तोडण्याचा निर्णय घेत धक्कादायक पाऊल उचललं आहे. पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं मोठी खऴबळ उडाली आहे.

महिला आपल्या पती आणि मुलांसमवेत स्टोनी, करनाल येथील पोल्ट्री फार्ममध्ये राहत होती. पती मोलमजुरी करून कुटुंबीयांचं पोट भरायचा. पत्नीनं सिमकार्डसाठी पतीकडे हट्ट धरला. त्यावर काही वेळा पतीनं टाळाटाळ केली. मात्र सिमकार्ड घेऊन देण्यास नकार दिल्यावर पत्नीनं टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं आहे. ही घटना हरियाणाच्या करनाल जिल्ह्यात ही घडली आहे.

कटेहरी जिल्ह्यातील रीवा मध्यप्रदेश वासी जवळ रामपाल आपल्या कुटुंबीयांसोबत दोन महिन्यांपासून राहात होता. मोलमजुरी करून आपल्या कुटुंबीयांचं भागवत होता. मंगळवारी त्याच्या पत्नीनं मोबाईलचे नवीन सिमकार्ड घेण्यासाठी हट्ट धरला. रामपालनं पत्नीचा हट्ट पुरवण्यासाठी नकार दिला. यावरून दोघांमध्ये खूप वाद झाला पण पतीनं तिची समजूत घ्यालण्याचा प्रयत्न केला.

हे वाचा-महिलांना ‘लाईनवूमन’ होण्याचा मार्ग मोकळा, हाय कोर्टाचे महत्वपूर्ण निर्देश

पत्नी हट्टाला पेटल्यानं दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. काही वेळानं पती सामान घेण्यासाठी घराबाहेर पडला तेव्हा रागाच्या भरात पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या महिलेच्या पश्चात दोन लहान मुलं आणि पती असा परिवार आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून चौकशी सुरू असल्याची माहिती दिली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 3, 2020, 9:46 AM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या