मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /बायकोशी 21 वर्षीय तरुण सारखा बोलायचा, नवऱ्याने अशी दिली शिक्षा, आता कुणाला सांगू शकत नाही!

बायकोशी 21 वर्षीय तरुण सारखा बोलायचा, नवऱ्याने अशी दिली शिक्षा, आता कुणाला सांगू शकत नाही!

6 महिन्यांपूर्वी महिलेच्या पतीने दोघांना बोलतांना पकडलं.

6 महिन्यांपूर्वी महिलेच्या पतीने दोघांना बोलतांना पकडलं.

' ही व्यक्ती आपल्या मित्रासोबत आली होती आणि त्याच्या हातात धारदार शस्त्र होते. या हल्ल्यात आपल्याला काहीच समजले नाही'

  • Local18
  • Last Updated :
  • Madhawgdha, India

मालवा, 20 मार्च : आपल्या पत्नीशी सारखा फोनवर का बोलतो म्हणून पतीने 21 वर्षीय तरुणाचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि त्याला मारहाण केल्याची खळबळजनक घटना मध्य प्रदेशातील आगर माळवा जिल्ह्यात घडली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. आरोपीही फरार झाला. पोलीस अनेक ठिकाणी त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरखेडी लडा इथं राहणाऱ्या 21 वर्षीय विवाहित तरुण 20 मार्च रोजी आपल्या भावासोबत सुसनेर पोलीस ठाण्यात पोहोचला. तिथं त्याने एका व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. त्याने पोलिसांना सांगितले की, 19 मार्च रोजी रात्री उशिरा तो एकटाच शेतात जात असताना त्याच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. ही व्यक्ती आपल्या मित्रासोबत आली होती आणि त्याच्या हातात धारदार शस्त्र होते. या हल्ल्यात आपल्याला काहीच समजले नसल्याचे तरुणाने पोलिसांना सांगितलं. हल्ल्यानंतर काही वेळातच तो बेशुद्ध पडला आणि रात्रभर तिथेच पडून राहिला.

(जबरदस्ती धर्मांतर, अत्याचारानंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती, श्रीरामपुरात पुन्हा लव्ह जिहाद?)

तरुणाने फिर्यादीत सांगितले की, सकाळी त्याचा भाऊ शेतात आला तेव्हा त्याला शुद्ध आली. शुद्धीवर आल्यानंतर आरोपीने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापल्याचे दिसून आले. तरुणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३२६, ३२३, २९४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. पोलीस तरुणाचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस तरुणाच्या शेजारच्याही चौकशी करत आहेत.

विवाहित महिलांशी बोलण्याची होती सवय

जखमी तरुणाला उज्जैन जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुसनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी विजय सगरिया यांनी सांगितलं की, जखमी तरुण हा स्वतः विवाहित असून तो दुसऱ्या विवाहित महिलेशी फोनवर बोलायचा.

(मुलाला भेटायला येणाऱ्या मित्राच्याच प्रेमात पडली महिला, नंतर घडलं असं काही....)

दोघेही सतत फोनवर संपर्कात होते. दरम्यान, 6 महिन्यांपूर्वी महिलेच्या पतीने दोघांना बोलतांना पकडलं. यानंतर त्याने पत्नी आणि पीडित तरुणाला समजावून सांगितलं. पण, त्याने काही ऐकलं नाही, त्यामुळे याचा राग त्याच्या मनात होता. तो त्याच्यावर हल्ला करण्याचा कट रचत होता. 19 मार्च रोजी अखेर त्याने या या तरुणावर हल्ला केला. जखमी झालेल्या तरुणाने पोलिसांत तक्रार दिली असून पोलीस अधिक तपास करत आहे.

First published:
top videos