हातोडा आणि लोखंडी हुकाने पत्नीवर केले 100 वार, मृतदेहावर बाळाला ठेऊन पती फरार

हातोडा आणि लोखंडी हुकाने पत्नीवर केले 100 वार, मृतदेहावर बाळाला ठेऊन पती फरार

पतीने हातोडा, धारधार लोखंडी हुकने पत्नीवर वार करून तिची क्रूरपणे हत्या केली. त्यानंतर तिचा नग्न अवस्थेत मृतेदह फेकून फरार झाला.

  • Share this:

औरंगाबाद, 15 फेब्रुवारी : औरंगाबागदमध्ये गुन्ह्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीने पत्नीची निर्घृण हत्या करून नग्न अवस्थेत मृतदेह फेकला. इतकंच नाही तर उलट्या काळजाच्या आरोपी पतीने अडीच वर्षाच्या मुलालाही आईच्या मृतदेहाजवळ सोडलं आणि फरार झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पतीने हातोडा, धारधार लोखंडी हुकने पत्नीवर वार करून तिची क्रूरपणे हत्या केली. त्यानंतर तिचा नग्न अवस्थेत मृतेदह फेकून फरार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पत्नीच्या शरीरावर 100 पेक्षा अधिक जखमा आहेत. जयश्री राम काळे असे मृत 28 वर्षीय महिलेचे नाव आहे. तर राम बाबूराव काळे असे आरोपी पतीचे नाव आहे.

आरोपीने पत्नीच्या हत्येनंतर अडीच वर्षीय लहान मुलाला मृतदेहाजवळ सोडून मोठ्या मुलाला घेऊन पसार झाला. शहरातील सातारा परिसरमधील अरुणोदय कॉलोनीत हा प्रकार घडला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

इतर बातम्या - सामनाच्या जाहिरातीमुळे कोकणात राजकारण पेटलं, शिवसेनेची नेमकी भूमिका काय?

पोलिसांनी घटनास्थळावरून पत्नीचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो नजिकच्या स्थानिक रुग्णालयता शवविवच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. पोलीस आरोपी पतीचा शोध घेत असून आईच्या मृतदेहाजवळ असलेल्या चिमुकल्याची पोलीस काळजी घेत आहेत.

इतर बातम्या - राज ठाकरे म्हणाले पक्षातच आहे गद्दार, 2 दिवसांत नावं समोर आणून करणार हकालपट्टी

दरम्यान, पतीने अशा प्रकारे पत्नीची निर्घृण हत्या करत सुखी चाललेला संसार का संपवला याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत असून आरोपी आणि त्याची पत्नी राहत असलेल्या परिसरात शेजाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. तर परिसरातील सीसीटीव्हीदेखील तपासण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

इतर बातम्या - लेकाला अग्नी देणाऱ्या बापाने दिली होती ठार मारण्याची सुपारी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 15, 2020 02:37 PM IST

ताज्या बातम्या