• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • भयंकर! किरकोळ कारणावरून केला पत्नीचा शिरच्छेद, खून करून पती फरार

भयंकर! किरकोळ कारणावरून केला पत्नीचा शिरच्छेद, खून करून पती फरार

किरकोळ कारणावरून पत्नीचा शिरच्छेद करून (Husband beheaded his wife for ordinary reason) पती फरार झाल्याची घटना समोर आली आहे.

 • Share this:
  पटना, 7 ऑक्टोबर : किरकोळ कारणावरून पत्नीचा शिरच्छेद करून (Husband beheaded his wife for ordinary reason) पती फरार झाल्याची घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणानंतर संतापलेल्या पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने (Husband murders wife) वार केले आणि तिचा बळी घेतला. पतीने पत्नीच्या मानेवर वार करत तिचं शीर धडापासून वेगळं केलं. या निर्घृण हत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. असा केला खून बिहारमधील छपरा भागात राहणारा आरोपी राजू गुरुवारी दहा वाजण्याच्या सुमाराला पत्नी आणि दोन मुलांसोबत घरी होता. त्याचे वडील दूर्गापूजेसाठी घराबाहेर गेले होते. याच दरम्यान दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यावेळी पतीनं धारदार शस्त्रानं पत्नीवर वार करत तिचा शिरच्छेद केला. आपल्या पत्नीचं शीर दारातच टाकून त्याने घरातून पळ काढला. जेव्हा त्याचे वडील घरी आले, तेव्हा सुनेचं दारात पडलेलं शीर आणि रडणारी मुलं पाहून त्यांना जबर धक्का बसला. पोलिसांना दिली माहिती महिलेच्या सासऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. आपला मुलगा राजू हा व्यवनाधीन असून त्याला दारूचं आणि ड्रग्जचं व्यसन असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे. नशेच्या अंमलाखालीच त्याने हे कृत्य केल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला आहे. मयत महिलेच्या वडिलांनी राजूविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. हे वाचा - माकडाच्या भीतीने घेतला जीव; 14 वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत सासऱ्यावरही संशय महिलेच्या माहरेच्या मंडळींनी खुनी पतीसोबत त्याच्या वडिलांवरदेखील गुन्हा दाखल केला आहे. वडिलांचीदेखील या कृत्यात साथ असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी खुनी राजू आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.
  Published by:desk news
  First published: