Home /News /crime /

विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी घरी आला प्रियकर, पतीने दिला चपलांनी प्रसाद आणि मग...

विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी घरी आला प्रियकर, पतीने दिला चपलांनी प्रसाद आणि मग...

आपल्या विवाहित प्रेयसीला (Married girlfriend) भेटण्यासाठी आलेल्या प्रियकराची (boyfriend) पतीने लाथा, बुक्क्या आणि चपलानी जोरदार धुलाई (Beaten) केली.

    लखनऊ, 8 सप्टेंबर : आपल्या विवाहित प्रेयसीला (Married girlfriend) भेटण्यासाठी आलेल्या प्रियकराची (boyfriend) पतीने लाथा, बुक्क्या आणि चपलानी जोरदार धुलाई (Beaten) केली. प्रेयसीचा पती घरी असेल, याची कल्पना नसल्यामुळे बिनधास्तपणे घरात बसलेल्या प्रियकराला जेव्हा प्रेयसीचा पती समोर दिसला, तेव्हा त्याची पळता भुई थोडी झाली. मात्र त्याला कुठेही पळू न देता पतीने आणि त्याच्या मित्रांनी या रोमियोला यथेच्छ बदडून काढले. एवढंच नव्हे, तर त्याला चपलांचा प्रसाद देत असतानाचा व्हिडिओदेखील शूट केला. पतीला मिळाली गुप्त सूचना ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या ललितपूरमधील. एक व्यक्ती आपल्या पत्नीला चोरून भेटायला येत असल्याची बातमी एका व्यक्तीने पतीला फोन करून दिली. त्यावेळी घराबाहेर असलेला पती आपल्या मित्रांना सोबत घेऊन घरी आला. तिथे असलेल्या प्रियकराला पाहून त्याची खात्री पटली आणि सर्वांनी मिळून प्रियकराची धुलाई केली. पत्नीने केला वाचवण्याचा प्रयत्न या सगळ्यात आपल्या प्रियकराला फार मार लागू नये, यासाठी प्रेयसी मदत करत असल्याचं दिसलं. पतीला आणि त्याच्या मित्रांना ती मारण्यापासून परावृत्त करत होती. मात्र पतीला न सांगता अचानक हा तरूण घरात सापडल्यामुळे पत्नीलाही फार काही बोलता येईना. हे वाचा - संतापजनक! मुलीने चोरी करताना पाहिलं म्हणून केली हत्या, घरातच गाडला मृतदेह शंकेची पाल वास्तविक ज्या तरुणाची धुलाई झाली, तो महिलेच्या पतीचा मित्रच होता. महिलेनं दिलेल्या माहितीनुसार आदल्या दिवशी सकाळी त्याने पतीसोबत चहा घेतला होता. त्या दिवशी रात्री दोघांनी एकत्र दारूदेखील प्यायली होती. मात्र दुपारच्या वेळी आपण घरी नसताना हा मित्र आपल्या घरी काय करत होता, असा जाब पतीने विचारला, त्यावेळी दोघेही निरुत्तर झाले. मित्रांनी हा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. तरुणाने आपल्याला मार मिळत असताना बिलकूल प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला नाही. मार दिल्यानंतर सर्वांनी मिळून तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Boyfriend, Crime, Uttar pardesh

    पुढील बातम्या