Home /News /crime /

सणकी! प्रेम सिद्ध करायला लावत पत्नीला पाजलं विष, पती पोहोचला तुरुंगात

सणकी! प्रेम सिद्ध करायला लावत पत्नीला पाजलं विष, पती पोहोचला तुरुंगात

आपल्या पत्नीला स्वतःचं प्रेम सिद्ध करायला लावण्यासाठी तिला विषारी औषध (Husband asked wife to prove loved and gave her pesticide) पाजणाऱ्या पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

    रायपूर, 29 नोव्हेंबर: आपल्या पत्नीला स्वतःचं प्रेम सिद्ध करायला लावण्यासाठी तिला विषारी औषध (Husband asked wife to prove loved and gave her pesticide) पाजणाऱ्या पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. माझ्यावर तुझं किती प्रेम आहे हे तपासून पाहायचं आहे, असं म्हणत पत्नीला जबरदस्तीने विषारी औषध पाजल्याप्रकरणी पतीवर गुन्हा (Police files charges against psycho husband) दाखल करण्यात आला आहे. पत्नीला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. पत्नीच्या हत्येचा प्रयत्न छत्तीसगडमधील बेमेतरा जिल्ह्यात यशवंत टंडन आणि उमा टंडन हे दांपत्य राहत होतं. घटनेच्या दिवशी बाहेरून फिरून आलेला यशवंत घरी येताच पत्नीकडे गेला. माझ्यावर तुझं किती प्रेम आहे, असं त्यानं पत्नीला विचारलं. त्यावर आपलं तुझ्यावर खूप प्रेम असल्याचं पत्नीनं सांगितलं. आपलं प्रेम सिद्ध करून दाखव, असं आव्हान त्यानं पत्नीला दिलं. त्यावर नेमकं काय करू, अशी विचारणा पत्नीनं केली. त्यानंतर मात्र यशवंतनं जे काही केलं त्यामुळे पत्नीचा त्याच्यावरचा विश्वास कायमचा उडाला. पत्नीला दिलं कीटकनाशक यशवंतने किचनमधून पत्नीला दुसऱ्या खोलीत नेलं आणि जबरदस्तीनं तिचं तोंड उघडून कीटकनाशक तोंडात घातलं. त्यामुळे पत्नीची तब्येत बिघडली. बेशुद्ध पडण्यापूर्वी केलेला आरडाओरडा ऐकून शेजारी तिच्या घरी धावत आले. तिची अवस्था पाहून तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पत्नीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर अद्यापही उपचार सुरू आहेत. हे वाचा-कोयत्याने बुलेट फोडून पेटवली, कबुतरांना जिंवत जाळलं, गुंडांचा हैदास, VIDEO पतीवर गुन्हा दाखल पोलिसांनी आरोपी पतीवर भारतीय दंडविधानाच्या कलम 307 नुसार खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला  आहे. आरोपी यशवंतला अटक करण्यात आली असून पोलिसांनी पत्नी उमाची जबानीदेखील नोंदवली आहे. उमानं स्वतः घटनेची साक्ष दिल्यामुळे यशवंतला कडक शिक्षा होण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Chattisgarh, Crime, Police, Wife and husband

    पुढील बातम्या