शेतात आढळले पती-पत्नीचे एकत्र मृतदेह, चंद्रपूरमधील खळबळजनक घटना

शेतात आढळले पती-पत्नीचे एकत्र मृतदेह, चंद्रपूरमधील खळबळजनक घटना

या दोघांचे मृतदेह अन्य व्यक्तीच्या शेतात आढळून आल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

  • Share this:

हैदर शेख, प्रतिनिधी

चंद्रपूर, 17 जानेवारी : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील घुग्गुस शहरालगत असलेल्या शांतीनगर भागातील शेतशिवारात पती-पत्नीचे मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विजेचा धक्का (Electric shock) लागून दोघांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संदेश तक्कला आणि उमेश्वरी तक्कला अशी मृतांची नाव आहे. संदेश आणि उमेश्वरी हे दोघे शांतीनगर भागात राहत होते.  हे दोघेही शनिवारी रात्रीपासून घरी नव्हते. शहराला लागून असलेल्या शांतीनगरमध्ये एका व्यक्तीच्या शेतामध्ये दोघांचे मृतदेह आढळून आले आहे.

महाराष्ट्रातील उद्योजकाचा दक्षिण आफ्रिकेत खून, 10 ते 12 जणांनी केले वार

विजेचा शॉक लागून या दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. जनावरांपासून संरक्षण मिळवण्यासाठी लावण्यात आलेल्या तारेला स्पर्श झाल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या दोघांचे मृतदेह अन्य व्यक्तीच्या शेतात आढळून आल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि घटनास्थळाचा पंचनामा केला. या दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.  हा आकस्मिक मृत्यू की घातपात होता, याबद्दल पोलीस तपास करत आहे. दाम्पत्याचा असा करुण अंत झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत.

लग्नाच्या वरातीत तरुणावर चाकूने हल्ला

दरम्यान,  उल्हासनगरमध्ये लग्नाच्या वरातीत क्षुल्लक कारणावरून झालेल्या बाचाबाचीमुळे एका जणावर  चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  कॅम्प नंबर 3 च्या खेमानी परिसरातून शुक्रवारी सायंकाळी ही वरात विवाहस्थळी जात होती. त्यावेळेस हा हल्ला करण्यात आला. या वरातीमधील रितेश शर्मा यांच्यावर वार झाले आहेत. रितेश शर्मा हे धुळ्याहून आपल्या मेव्हण्याच्या मुलाच्या लग्नासाठी उल्हासनगरला आले होते.

MBA पूर्ण झाल्यानंतर सुरू केलं अवैध काम; आता दिवसाला करतो 9 लाखांचा व्यवसाय

खेमानी येथील रस्त्यावरून ही वरात जात असतांना गर्दीतून एक दुचाकीस्वार दुचाकी चालवत होता.  याच वेळी त्याने वरतीमधील एकाला दुचाकीची ठोकर लागली. त्यामुळे त्याच्यामध्ये वाद विवाद झाले. दरम्यान दुचाकीस्वार तिथून निघून गेल्यानंतर त्यांनी आपल्या सोबत सहा ते सात लोकांना घेऊन आले आणि वरतीमधील वऱ्हाड्यांना मारहाण सुरू केली तर एकाने जवळ बाळगलेल्या चाकूने रितेश शर्मा त्यांच्यावर वार केले. यात शर्मा त्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Published by: sachin Salve
First published: January 17, 2021, 4:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या