मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Long Distance Relationship अन् रात्रभर पती पत्नीत कडाक्याचं भांडण, सकाळी सुखी संसाराचा The End!

Long Distance Relationship अन् रात्रभर पती पत्नीत कडाक्याचं भांडण, सकाळी सुखी संसाराचा The End!

दोघांनी दोन वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात लग्न केले होते.

दोघांनी दोन वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात लग्न केले होते.

दोघांनी दोन वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात लग्न केले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jharkhand, India
  • Published by:  Khushalkant Dusane

गिरिडीह, 30 नोव्हेंबर : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. हत्या, आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पती-पत्नीमध्ये रात्रभर वाद झाल्यानंतर सकाळी घरात दोघांचे मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या दोघांचे 2 वर्षांपूर्वीच लग्न झाले होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

ही घटना झारखंड राज्यातील गिरिडीहच्या जमुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धुरगडगी गावात घडली. याठिकाणी पती-पत्नीने एकाच वेळी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनी दोन वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. घटनेची माहिती मिळताच जामुआ पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली.

या घटनेचे मूळ कारण काय, हे सध्यातरी समोर आलेले नाही. नातेवाइकांनाही घटनेचे कारण सांगता येत नाही आहे.

25 वर्षीय संतोष कुमार वर्मा याचा विवाह 2020 मध्ये 22 वर्षीय पत्नी सुरभीसोबत झाला होता. लग्नानंतर दोघांनीही शिक्षण सुरू ठेवले. पती हजारीबागमध्ये राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. तर त्याने रेल्वे टीटीची पहिली परीक्षा पास झाला होता तर आणखी एक परिक्षा तो उत्तीर्ण व्हायचा होता.

त्याचवेळी पत्नी सुरभी वडिलांसोबत कोलकाता येथे ग्रॅज्युएशन पूर्ण करत होती. मात्र, महिनाभरापूर्वी पत्नी धूर्गडगी येथे सासरी आली होती. तर पती संतोष सुरजाही उत्सवाच्या एक दिवस आधी शनिवारी घरी आला होता. रविवारी दिवसभर दोघेही आनंदाने सुरजाही उत्सवात सहभागी झाले होते. मात्र, यातच दोघांमध्ये काही गोष्टीवरून बोलणे झाले. यानंतर रात्रभर दोघांमध्ये वाद झाला. दोघांचा आरडाओरडा ऐकून कुटुंबीयांनी रात्री उशिरा दोघांनाही शांत केले. मात्र, दोघांमधील वाद सुरूच होता.

हेही वाचा - जिथं गेला तिथं केलं लग्न! 4 राज्यात 6 संसार करणाऱ्याचं असं फुटलं भांडं

त्यानंतर दोघांनीही एकाच फासावर गळफास घेऊन जीवन संपवले. जमुआ पोलीस स्टेशनचे प्रभारी पप्पू यादव यांनी सांगितले की, 2 मृतदेह त्यांच्या ताब्यात घेतले आहेत आणि पोस्टमॉर्टमसाठी गिरिडीह हॉस्पिटलमध्ये पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतरच सत्य बाहेर येईल. कारण हे प्रकरण संशयास्पद वाटत असून नातेवाईकही कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Death, Jharkhand, Wife and husband