मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय; 10 वर्षांपासून सुरू होतं घृणास्पद कृत्य

पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय; 10 वर्षांपासून सुरू होतं घृणास्पद कृत्य

आतापर्यंत या दाम्पत्याने हजारो परदेशातील तरुणींची तस्करी केल्याचं समोर आलं आहे.

आतापर्यंत या दाम्पत्याने हजारो परदेशातील तरुणींची तस्करी केल्याचं समोर आलं आहे.

आतापर्यंत या दाम्पत्याने हजारो परदेशातील तरुणींची तस्करी केल्याचं समोर आलं आहे.

इंदूर, 26 नोव्हेंबर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये (Indore) पोलिसांनी मानवी तस्करीचा (Human Trafficking) भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून (Bangladesh) तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8 सदस्यांना अटक केली आहे. या टोळीचा प्रमुख मामून हुसेन यावर 20,000 रुपयांचं बक्षीस घोषित केलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 10 वर्षात ही टोळी मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी तरुणींना अवैधपणे सीमा पार करून भारतातील विविध भागात पाठवत होते. पोलीस अधीक्षक आशुतोष बागरी यांनी इंदूरमध्ये सांगितलं की, या टोळीचा प्रमुख बांग्लादेशी नागरिक  (Bangladeshi Citizen) मामून हुसैन (41) या नावाने झाली आहे.

पोलीस अधीक्षकांनी सांगितलं की, मामून तब्बल 25 वर्षांपूर्वी भारतात आल्यानंतर विजय दत्त या नावाने खोटं रेशन कार्ड तयार केलं होतं. रेशन कार्डाच्या आधारावर त्याने बनावटी आधार कार्ड, वोटर आयडी आणि पासपोटदेखील तयार केला होता. बागरींनी दिलेल्या माहितीनुसार, मामूनची बांग्लादेशात राहणारी पत्नी देखील त्याच्या टोळीत सामील झाली आणि ती एका संघटनेशी जोडल्याचा दावा करीत अनाथ, निराधार आणि गरजू तरुणींना भारतात घरेलू कामासंबंधित रोजगार मिळवून देण्याचं कारण सांगून फसवत होती. त्यांनी सांगितलं की, गेल्या 10 वर्षात अशा हजारो बांग्लादेशी तरुणींना मामूनच्या टोळीने अवैधपणेन सीमा पार करीत भारतातील विविध भागांमध्ये पाठवलं आणि त्यांना देह विक्री व्यापारात ढकललं.

हे ही वाचा-आईवर प्रेम आणि मुलीसोबत चाळे; डबल गेम करणाऱ्या BF ला मायलेकीनं दिला भयंकर मृत्यू

पोलीस अधीक्षक पुढे म्हणाले की, मामूनने विविध शहरातील दलालांना आपल्या टोळीशी जोडलं होतं आणि देह व्यापारात ढकलेल्या बांग्लादेशी तरुणींना मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, तमिलनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि अन्य राज्यांमध्ये ग्राहकांकडे पाठवित होते. त्यांनी पुढे सांगितलं की, मामूनने भारतातदेखील एका महिलेशी लग्न केलं आहे आणि विजय दत्त या आपल्या खोट्या ओळखीतून सर्वांचीच फसवणूक करीत होता.  बाहरीने सांगितलं की, तरुणींची मानवी तस्करी आणि देह व्यापारातून मिळणारी रक्कम मामून हवालाच्या माध्यमातून बांग्लादेशात पाठवित होता. त्यांनी पुढे सांगितलं की, मामूनशिवाय त्याच्या टोळीतील 8 सदस्यांनादेखील अटक करण्यात आली आहे. यात चार महिलांचा समावेश आहे. या प्रकरणाची सविस्तर तपासणी सुरू आहे.

First published:

Tags: Wife and husband