आग्रा, 8 ऑगस्ट : एका सेल्स ऑफिसरचा (Sales Officer) पोत्यात गुंडाळलेला मृतदेह (Dead Body) मिळाल्यामुळे एकच खळबळ उडालीय. पती आणि पत्नीनं (Husband and Wife) संगनमतानं या सेल्स ऑफिसरचा खून करून त्याचा मृतदेह पोत्यात भरला आणि तो सुनसान ठिकाणी आणून फेकून दिल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. अत्यंत थंड डोक्यानं योजना आखून हा खून केल्याचं (Cold blooded murder) प्राथमिक तपासात समोर येत असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
अशी घडली घटना
आग्र्यामध्ये एका वाहन कंपनीत सेल्स ऑफिसर म्हणून काम करणारे सुनील कुमार शर्मा यांचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना सापडला. 2 ऑगस्टपासून सुनील कुमार बेपत्ता होते आणि पोलीस त्यांचा शोध घेत होते. त्या दिवशी घरातून सकाळी साडेनऊच्या सुमाराला बाहेर पडलेले सुनील कुमार घरी परत आलेच नाहीत. त्या दिवशीच त्यांच्या कुटुंबाने घातपाताची शक्यता वर्तवली होती, ती दुर्दैवानं खरी ठरली आहे.
असा झाला खून
हा खून मोना आणि तिचा पती अजय या दांपत्याने केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे पतीपत्नी आणि सुनील आठ वर्षांपूर्वी ओळख झाली होती. सुनील यांच्या घरासमोर मोना आणि अजय यांनी भाड्याने घर घेतले होते. तेव्हापासून त्यांनी ओळख होती. 2 ऑगस्टला सुनील हे काही कारणास्तव मोना आणि अजयच्या घरी गेले होते. त्यावेळी डोक्यात लोखंडी रॉड घालून दोघांनी सुनील यांची हत्या केली. हा खून लपवण्यासाठी त्यांनी मृतदेह पोत्यात भरला आणि गाडीतून ते शहराच्या विविध भागात सुमारे 7 किलोमीटर फिरले. त्यानंतर एक सुनसान जागा पाहून त्यांनी सुनील यांचा मतदेह झाडीत फेकून दिला.
हे वाचा -शिकवणीसाठी बोलवून विद्यार्थिनीचं करायचा लैंगिक शोषण; नराधम शिक्षकाचा कांड उघड
असा झाला उलगडा
य़ा खुनाचे नेमके कारण पोलिसांना अद्याप समजलेले नाही. मात्र सुनील बेपत्ता झाल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात सुनील 2 तारखेला शेवटचे पेट्रोल पंपावर गेल्याचं दिसलं. त्यानंतर ते मोना यांच्या घराच्या दिशेने गेल्याचं पोलिसांना दिसलं. त्याच दरम्यान मोना आणि अजय यांची कार शहरात फिरत असल्याचं पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळलं. त्यावरून त्यांनी कारच्या मालकाचा शोध लावला आणि मोना-अजय यांची चौकशी केली. त्यात मोना-अजय हे पूर्वीपासून सुनील यांना ओळखत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावर पोलिसी खाक्या दाखवताच मोनाने खुनाने कबुली दिली.
पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून खुनाच्या कारणांचा लवकरच उलगडा होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Agra, Murder Mystery, Uttar pardesh