मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

प्रियकरासाठी परिवारासोबत बंड, लग्नानंतर तीन वर्षात तरुणीसोबत धक्कादायक कृत्य

प्रियकरासाठी परिवारासोबत बंड, लग्नानंतर तीन वर्षात तरुणीसोबत धक्कादायक कृत्य

अनिता ही तीन वर्षांपूर्वी अनिलच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की, ज्यांनी तिला जन्म दिल्यानंतर वाढवले तिने त्याच आपल्या कुटुंबाविरुद्ध बंड केले होते.

अनिता ही तीन वर्षांपूर्वी अनिलच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की, ज्यांनी तिला जन्म दिल्यानंतर वाढवले तिने त्याच आपल्या कुटुंबाविरुद्ध बंड केले होते.

अनिता ही तीन वर्षांपूर्वी अनिलच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की, ज्यांनी तिला जन्म दिल्यानंतर वाढवले तिने त्याच आपल्या कुटुंबाविरुद्ध बंड केले होते.

    बगहा, 7 ऑगस्ट : बिहारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका प्रेमी युगुलाने सात जन्मापर्यंत सोबत राहण्याच्या शपथा घेतल्या होत्या. प्रेमात वेड्या झालेल्या तरुणीने आपल्या परिवाराला सोडले होते. ज्या तरुणासाठी तिने आपल्या परिवाराला सोडले होते. त्याने लग्नाच्या तीन वर्षातच आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - ही घटना बिहारच्या बगहा येथील आहे. मृत तरुणीचे नाव अनिता आहे. ती तीन वर्षांपूर्वी अनिलच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की, ज्यांनी तिला जन्म दिल्यानंतर वाढवले तिने त्याच आपल्या कुटुंबाविरुद्ध बंड केले होते. जेव्हा अनिता आणि अनिलची प्रेमकहाणी फुलू लागली तेव्हा गावकऱ्यांनी दोघांनाही 2019 मध्ये लग्न लावू दिले. प्रियकर पती अनिल चौधरीसोबत अनिताही आनंदाने राहायला लागली. मात्र, दोघांच्याही आनंदावर घरच्यांनी विर्जण घातले. सर्व नातेसंबंध सोडून सासरी पोहोचलेल्या अनिताच्या सासरच्या लोकांनी तिच्याकडे हुंड्याची मागणी सुरू केली. यासाठी तिच्यासोबत भांडण केले जाऊ लागले. तसेच तिला मारहाणही करण्यात आली. इतकेच नव्हे तर ज्या प्रियकर अनिलसोबत तिने लग्न केले. त्यानेच तिचा घात केला. शनिवारची रात्र तिच्यासाठी काळरात्र ठरली. बगाहा नगर पोलीस स्टेशन हद्दीतील आनंद नगर मोहल्ला वॉर्ड क्रमांक 26 मध्ये राहणारे छोटेलाल चौधरी यांचा मुलगा अनिल चौधरी याची पत्नी अनिता देवी हिचा मृतदेह आढळून आल्याने गावात खळबळ उडाली आहे. अनिता आणि अनिल चौधरी यांचा प्रेमप्रकरणातून विवाह झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. मृत विवाहित तरुणीचे वडील सुभाष चौधरी यांनी सांगितले की, माझ्या मुलीचा हुंड्यासाठी छळ केला जात होता. तीन लाखांची मागणी केली जात होती. हुंड्याचे तीन लाख रुपये न दिल्याने सासरे छोटेलाल चौधरी, पती अनिल चौधरी आणि सासू चिंता देवी यांनी माझ्या मुलीचा गळा आवळून खून केला, असे त्यांनी सांगितले. हेही वाचा - साखरपुड्यानंतर 3 दिवसातच तरुणीने घेतला जगाचा निरोप; तलावात 2 मृतदेह आढळल्याने खळबळ दरम्यान, घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी मृताचा मृतदेह ताब्यात घेतला आणि यानंतर शवविच्छेदन करण्यादत आले. एसडीपीओ कैलाश प्रसाद यांनी सांगितले की, मृताचे वडील सुभाष चौधरी यांनी मुलीच्या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या हत्येप्रकरणी पोलिसांनी अनिताचा पती अनिल चौधरी, सासरा छोटेलाल चौधरी आणि सासू चिंता देवी यांना अटक केली आहे. बगाहा एसएचओ अनिल कुमार सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bihar, Crime news, Murder news

    पुढील बातम्या