रायपूर, 14 जून : छत्तीसगडमधून (Chhattisgarh News) एक हैराण करणारं वृत्त समोर आलं आहे. येथे एक तरुण आणि त्याच्या प्रेयसीचे कपडे काढून गावात फिरवण्यात आलं. हे अत्यंत संवदेनशील प्रकरण समोर आल्यानंतर पोलीस-प्रशासनात खळबळ उडाली. या भयंकर कृत्याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर (Video Viral On Social Media) व्हायरल करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी आता 4 जणांना अटक केली आहे.
ही घटना कोंडागाव जिल्ह्यातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या तरुणाला त्याच्या पत्नीने प्रेयसीसह खोलीत रंगेहात पकडलं होतं. यानंतर महिलाने गोंधळ घातला, (wife was angry after being caught with girlfriend) अन् गावकऱ्यांना बोलावलं होतं. यानंतर गावकऱ्यांनी स्वत: तरुण आणि त्याच्या प्रेयसीला शिक्षा देण्याचा निर्णय घेतला.
शिक्षेसाठी आधी विवाहित तरुण आणि त्याच्या प्रेयसीला जबर मारहाण केली. यानंतर दोघांचे कपडे काढून गावात फिरवलं. ही घटना शनिवारची असून याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात 4 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, व्हिडीओ समोर आल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत 4 आरोपींना पकडण्यात आलं आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.