लखनऊ 07 जून : लग्नासाठी 300 हून अधिक मुलींचा सौदा (Human trafficking) केलेल्या एका व्यक्तीनं स्वतःच्या सुनेला 80,000 रुपयात विकलं. यासाठी गुजरातहून आठ लोक आले आणि सौदा झाला. पैसेही दिले. पोलिसांनी या महिलेची खरेदी करणाऱ्या गुजरातच्या आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याविरोधात मानवी तस्करीसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, या महिलेला तिच्या पतीकडे सोपवण्यात आलं आहे. पोलिसांनी सांगितलं, की रात्री 12 वाजता युवकानं पोलिसांना फोन केला आणि सांगितलं की त्याच्या पत्नीला त्याच्याच वडिलांनी 80,000 हजारात गुजरातच्या काही लोकांना विकलं आहे.
पतीनं याबाबतची माहिती देताच पोलीस बाराबंकी रेल्वे स्टेशनवर पोहोचले आणि या महिलेची सुटका केली. यासोबतच तिला घेऊन जाणार आठ जणांना अटक केली. साहिल पंचा,पप्पू भाई शर्मा, अपूर्व पंचा, गीता बेन, नीता बेन, शिल्पा बेन, राकेश आणि अजय भाई पंचा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत.
हे प्रकरण रामनगर ठाणा क्षेत्रातील मल्लापूर येथील आहे. इथे राहाणाऱ्या चन्द्रराम वर्माचा मुलगा प्रिंस वर्मा ( वय 19) गाजियाबादमध्ये टॅक्सी चालकाचं काम करतो. पाच वर्षापूर्वी 2016 मध्ये त्याची बातचीत एका अॅपच्या माध्यमातून आसामच्या एका मुलीसोबत झाली. तीन वर्षानंतर दोघांनी लखनऊमधील एका मंदिरात लग्नगाठ बांधली. यानंतर तो पत्नीला घेऊन गाजियाबादला आला.
बापरे! स्वच्छतागृहात आढळला साडेसहा फुटाचा नाग, पोलिसाची पळता भुई थोडी
चौकशीत समोर आलं, की याच गावातील रहिवासी असलेला रामू गौतम लॉकडाऊनमध्ये अहमदाबादहून आपल्या घरी आला. यावेळी त्यानं प्रिसचे वडील चन्द्र राम वर्माला सांगितलं, की अहमदाबादमधील त्याचा एक मित्र साहिल पंचा याचं लग्न जमत नाहीये. त्याचा लग्न जमवून दिल्यास मोठी रक्कम मिळेल. यावर चन्द्र राम वर्मानं आपल्या सुनेला विकण्याची त्याला बोललं. यानंतर कट रचून खोटं बोलत तब्येत खराब झाल्याचं सांगून सुनेला गाजियाबादहून बोलावलं गेलं. चार जूनला सुनला मल्लापुर येथे आली. यानंतर तिच्या सासऱ्यानं 60,000 स्वतःकडे ठेवले तर 20,000 आपल्या मुलाच्या खात्यात टाकले. यानंतर पाच जूनला महिलेचा पतीही त्याठिकाणी आला. मात्र, सासऱ्यानं गुजरातहून आलेल्या लोकांसोबत सुनेला पाठवलं आणि सांगितलं, की हे लोक तुला गाजियाबादमध्यो सोडतील.
पोलीस सध्या या महिलेच्या सासऱ्याचा आणि रामू गौतम याचा शोध घेत आहेत. युवतीच्या पतीनं सांगितलं, की त्याचे वडील एका हत्येच्या प्रकरणात आरोपी आहेत. आईलादेखील या व्यक्तीनं मारहाण करून जीवे मारलं होतं. बहिणीसोबतही चुकीचं कृत्य केलं होतं. त्याच्या वडिलांना आतापर्यंत बिहार आणि पूर्वांचलमधील 300 हून अधिक तरुणींना विकलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Uttar pradesh