इंदूर, 7 सप्टेंबर : विमानाने चाललेल्या एका साध्वीच्या (
Sadvi) बॅगेत (
Bag) मानवी कवटी (
Human skull) सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आपल्या बॅगेत मानवी कवटी आणि हाडं घेऊन चाललेल्या साध्वीला पोलिसांनी रोखल्यानंतर साध्वीचं स्पष्टीकरण ऐकून पोलीसदेखील चक्रावले. आपल्या सहकारी साधूच्या मृत्यूनंतर त्याची कवटी आणि त्याच्या अस्थि विसर्जनासाठी हरिद्वारला घेऊन चालल्याचं या साध्वीनं सांगितलं.
असा उघड झाला प्रकार
इंदूर विमानतळावर उज्जैनच्या एका साध्वीनं बॅगेसह प्रवेश केला. नेहमीचे सोपस्कार पूर्ण करून सिक्युरिटी चेकपर्यंत ती आली. तिथं बॅगेचं स्कॅनिंग केल्यानंतर पोलिसांना काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्या. त्यांनी साध्वीला बॅग उघडायला लावली आणि त्याची तपासणी केली. त्यावेळी तिच्या बॅगेतून मानवी कवटी आणि काही अस्थि पोलिसांना मिळाल्या. याबाबत चौकशी केली असता आपल्या सहकाऱ्याच्या या अस्थि असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्या हरिद्वारला घेऊन चालल्याचं साध्वीनं सांगितलं.
मात्र पूर्व परवानगीशिवाय, प्रवासी विमानातून अशा प्रकारे मानवी कवटी नेता येणार नसल्याचं सांगत पोलिसांनी तिला थांबवून ठेवलं. त्यानंतर साध्वीनं इतर साधूंना विमानतळावर बोलावून घेतलं आणि त्या अस्थि त्यांच्याकडे सोपवल्या. इतर साधूंना रस्त्याने हरिद्वारला पोहोचण्याची विनंती करून साध्वी विमानाने गेली.
हे वाचा -
'हजारो लोकांसमोर झाला बलात्कार'; 2 महिन्यांनंतर पीडितेनं सांगितली ती भयानक घटना
नियम काय सांगतो?
विमानतळ प्राधिकरणाच्या नियमानुसार मानवी अस्थि किंवा अवयव प्रवासी विमानातून न्यायचे असतील, तर त्याची पूर्वकल्पना विमानतळ प्रशासनाला द्यावी लागते. एका हँडबॅगेत ठेऊन विमानातून अस्थि नेण्यास परवानगी देण्यात येते. मात्र साध्वीच्या चेक-इन लगेजमध्येच त्या अस्थि ठेवल्या होत्या. त्यासाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती.
साध्वीला रोखल्यानंतर इतर साधू तिथं पोहोचले. त्यांनी पोलिसांना सहकाऱ्याचं मृत्यूपत्र दाखवत त्याच्याच या अस्थि असल्याचं सांगितलं. या सहकाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहितीदेखील दिली. त्यानंतर पोलिसांनी सर्वांना तिथून जाण्याची परवानगी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.