Home /News /crime /

'बड्डे बॉय'ला जेवण मिळाले नाही, मित्राने मालकाच्या डोक्यावर ठेवला गावठी कट्टा!

'बड्डे बॉय'ला जेवण मिळाले नाही, मित्राने मालकाच्या डोक्यावर ठेवला गावठी कट्टा!

"बर्थ डे बॉय'' रागात गेल्याने मित्राला राग आला आणि मित्राने हॉटेल चालकाला बंदुकीचा धाक देऊन धमकवण्यास सुरुवात केली होती.

डोंबिवली, 24 फेब्रुवारी : खोणी-तळोजा महामार्गाच्या बाजूला असलेल्या उसाटने काही तरुण हे आपल्या साथीदारांसह वाढदिवसाची पार्टी साजरी करण्यासाठी बबलू हॉटेल येथे जेवण करण्यासाठी गेले होते. मात्र हॉटेल बंद असल्याने आरोपी नितेश गुप्ता याने गावठी कट्टा थेट हॉटेल मालकाला दाखवून जेवण का दिल नाही? याचा जाब विचारून धमकवण्यास सुरुवात केली होती. अखेर हॉटेल चालकाने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी तपासला सुरुवात देखील केली आहे. शहरात हॉटेलच्या किंमती या गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे शहरातील नागरिक मौज-मजा आणि पार्ट्या करण्यासाठी ग्रामीण भागात वळले आहेत. यामध्ये सर्वाधिक सहभाग हा तरुणांचा असलेला पहावयास मिळत आहे. खोणी-तळोजा या राज्य महामार्गावर असलेल्या बबलू हॉटेलमध्ये गुरुवारी चार तरुण आले होते. पहाटे 3 च्या सुमारास हॉटेल बंद असल्याने चालकाने त्यांना हॉटेल बंद आहे असं सांगितलं. मात्र, "बर्थ डे बॉय'' रागात गेल्याने मित्राला राग आला आणि मित्राने हॉटेल चालकाला बंदुकीचा धाक देऊन धमकवण्यास सुरुवात केली होती. मात्र हुशार असलेल्या हॉटेल चालकाने पोलीस यंत्रणेला माहिती दिल्याने हिललाई पोलीस ठाण्याचे पोलीस पो.ना.विनोद ठाकूर, पो.ना.प्रवीण पाटील आणि पो.ना.दत्ता जाधव यांनी सापळा रचत आरोपी  मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी नितेश गुप्ताकडे असणारे शस्त्र देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून पो.उप.निरीक्षक सचिन वगरे पुढील तपास करत आहेत. वाढदिवशी शहरभर धिंगाणा घालताना पोलीस यंत्रणांना दिसल्यास पोलीस आपल्या पद्धतीने "बर्थडे बॉय" सह शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या मित्रांना शुभेच्छा देत असतात. मात्र, आता थेट डोंबिवली सारख्या शहरातून मलंगगड भागात तरुण शस्त्र घेऊन फिरत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. डोंबिवली मधील गुन्हेगारीचा आलेख हा सर्वांना माहीतच आहे. मात्र डोंबिवली मधून शस्त्र घेऊन तरुण थेट ग्रामीण भागात फिरकत असल्याने पोलीस यंत्रणांची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढली आहे.  या तरुणांचा पोलीस कसून तपास करत आहेत. हे तरुण नक्की वाढदिवस करण्यासाठी आले होते की, अन्य कारणासाठी हे आता तपासानंतर समजणार आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या