• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • संसार सुरू होण्याआधीच शेवट; लग्न करण्यासाठी घरातून पळालेल्या प्रेमी जोडप्याचा भयावह मृत्यू

संसार सुरू होण्याआधीच शेवट; लग्न करण्यासाठी घरातून पळालेल्या प्रेमी जोडप्याचा भयावह मृत्यू

या घटनेचा तरुणाच्या भावाचाही मृत्यू झाला.

 • Share this:
  उत्तर प्रदेश,1 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) एटा जिल्ह्यातील एक प्रेम कहाणीचा अत्यंत दु:खदायक Shockin(g News) शेवट झाला. प्रेम विवाहासाठी घरातून पळालेल्या प्रेमी युगुलाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू (Couple death) झाला आहे. तरुणाचा चुलत भावाचादेखील या अपघातात (Road Accident) मृत्यू झाला आहे. तिघांचेही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले आहेत. पोलिसांनी तिन्ही मृतांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली आहे. (Horrific death of a loving couple who ran away from home to get married) ही घटना एटाच्या पोलीस ठाणे हद्दीतील रेल्वे फ्लायओव्हरजवळ रविवारी रात्री साधारण 12 वाजता घडली. पोलीस ठाण्याचे प्रमुख निरीक्षक जगदीश चंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा चुलत भाऊ आणि तरुणी बाइकवरुन जात होते. रेल्वे फ्लायओव्हरजवळ एका अज्ञात वाहनाने बाइकला धडक दिली. यात तिघांचा मृत्यू झाला. तिघांची ओळख पटली आहे. हे ही वाचा-VIDEO : Tata Punch ची डिलीव्हरी घेताना घडली मोठी चूक; नवी कार झाली खटारा! पोलीस ठाणे प्रमुखांनी सांगितलं की, तरुण आणि तरुणीचा जागेवरच मृत्यू झाला होता. मृत तरुणाचा चुलत भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र येथेच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्याने पोलिसांना सांगितलं की, तरुण-तरुणीचं प्रेम प्रकरण सुरू होतं. दोघेही लग्न करण्यासाठी घरातून पळाले होते. तरुण त्यांना सोडण्यासाठी कासगंज जात होता. यादरम्यान हा अपघात घडला.
  Published by:Meenal Gangurde
  First published: