मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Honor Killing: परजातीतल्या मुलावर प्रेम केलं म्हणून सख्ख्या धाकट्या भावानंच घेतला ताईचा जीव

Honor Killing: परजातीतल्या मुलावर प्रेम केलं म्हणून सख्ख्या धाकट्या भावानंच घेतला ताईचा जीव

Honor Killing: 18 वर्षांच्या युवकानं 23 वर्षाच्या सख्ख्या बहिणीची (Elder Sister shot by brother) गोळी झाडून हत्या केली. कारण तिचे शेजारी राहणाऱ्या युवकाशी प्रेमसंबंध होते आणि तो परजातीचा होता.

Honor Killing: 18 वर्षांच्या युवकानं 23 वर्षाच्या सख्ख्या बहिणीची (Elder Sister shot by brother) गोळी झाडून हत्या केली. कारण तिचे शेजारी राहणाऱ्या युवकाशी प्रेमसंबंध होते आणि तो परजातीचा होता.

Honor Killing: 18 वर्षांच्या युवकानं 23 वर्षाच्या सख्ख्या बहिणीची (Elder Sister shot by brother) गोळी झाडून हत्या केली. कारण तिचे शेजारी राहणाऱ्या युवकाशी प्रेमसंबंध होते आणि तो परजातीचा होता.

मेरठ, उत्तर प्रदेश, 27 सप्टेंबर: गेल्या काही वर्षात प्रेमसंबंधाच्या कारणामुळं गुन्हे (Crime in UP ) घडण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यात ऑनर किलिंगचं (honour Killing) प्रमाणही लक्षणीय आहे. कुटुंबीयांच्या मनाविरुद्ध किंवा परजातीतील व्यक्तीशी लग्न (intercast marriage) केल्यास बहुतेक वेळा मुलीच्या घरचे त्या मुलीला आणि तिच्या पतीची हत्या घडवून आणतात. अशी प्रकरणं संपूर्ण देशातच दिसून येतात. सामान्यपणे कुटुंबाच्या सन्मानाला ठेच पोहोचवली हे कारण देत निर्दयीपणे जीव घेतले जातात. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये (Meerut) नुकतीच एक ऑनर किलिंगची घटना घडली. बहिणीचे शेजारील व्यक्तीसोबत असलेले प्रेम संबंध अमान्य असल्यानं धाकटया भावानं बहिणीची बंदुकीची गोळी मारून हत्या (Murder in Meerut) केली आहे. याबाबतचं वृत्त `दैनिक भास्कर`नं दिलं आहे.

मेरठमध्ये ऑनर किलिंगची घटना उघडकीस आली आहे. येथील सरधाना पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात बुधवारी रात्री 18 वर्षांच्या युवकानं 23 वर्षाच्या सख्ख्या बहिणीची (Elder Sister fired by brother) गोळी झाडून हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. बहिणीचे घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. ती त्या व्यक्तीसोबत लग्न (Marriage) करु इच्छित होती. मात्र, हे संबंध उघड झाल्यास कुटुंबाची बदनामी होईल, या विचारानं भावानं हे कृत्य केलं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

तरुणाचं Ex-Girlfriend सोबत विकृत कृत्य; आधी मारहाण, मग सूटकेसमध्ये भरलं अन्..

घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र त्याच्या शोधार्थ 2 पोलिस पथकं रवाना करण्यात आली होती. सकाळी त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीनं हत्येसाठी वापरलेलं पिस्तूल जप्त करण्यात आलं आहे. आरोपीनं गुन्हा कबूल केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी (Post Mortem) पाठवण्यात आला असून, पोलीस पुढील कारवाई करत असल्याची माहिती एसएसपी प्रभाकर चौधरी यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरधानातील एका वस्तीत राहणाऱ्या मूळच्या इस्लामाबाद येथील मोहम्मद सलीम यांची मुलगी सिमरन (वय 23) हिचे घराशेजारी राहणाऱ्या एका युवकासोबत प्रेमसंबंध (Love Affair) होते. या संबंधाला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. सिमरन त्या युवकाशी लग्न करू इच्छित होती. सिमरनच्या कुटुंबीयांना 3 महिन्यांपूर्वी या प्रेम प्रकरणाविषयी समजलं. त्यानंतर त्यांनी सिमरनला घराबाहेर पडण्यास मनाई केली. त्यानंतर सिमरन चोरून त्या युवकाशी मोबाईलवरून बोलत असे. 3 दिवसांपूर्वी सिमरनच्या लहान भावानं तिला त्या युवकासोबत पाहिलं होतं. त्याचवेळी त्यानं सिमरनच्या हत्येचा प्लॅन आखला.

गुप्तधनासाठी पत्नीचा नरबळी देण्याचा प्रयत्न; बायकोच्या अंगाला अंगारा लावला पण..

सिमरनचा लहान भाऊ आरिफ (वय 18) याने आपली खूप बदनामी होत असल्याचं घरी येऊन सांगितलं होतं. सिमरनमुळं घराच्या परिसरातील मुलं आपल्याला टोमणे मारतात असंही त्याने सांगितलं. त्यामुळं आधिक बदनामी आता सहन होत नाही. मी सिमरनला जिवंत ठेवणार नाही, असं आरिफने घरच्यांना म्हटल्याचं त्याने पोलीस चौकशीत सांगितलं.

सरधाना पोलीस ठाण्याचे एसओ सुरेंद्र मलिक यांनी सांगितलं की सिमरन रात्रीच्यावेळी खोलीत झोपली होती. त्याचवेळी तिचा लहान भाऊ आरिफ पिस्तूल घेऊन तिच्या खोलीत गेला आणि गोळी झाडून सिमरनची हत्या केली. या घटनेत सिमरनचा जागीच मृत्यू झाला. गोळीच्या आवाजानं कुटुंबीय आणि शेजारील लोक जागे झाले. सिमरनला तिच्या प्रियकराशीच लग्न करायचं होतं. मात्र आता तिला ‘जन्नत’ म्हणजे स्वर्ग मिळाल्याचं घटनेनंतर आरिफनं कुटुंबियांना सांगितलं. घटना घडल्यानंतर त्याची माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

First published:

Tags: Crime, Crime news, Uttar pradesh