मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

24 तासांचे 3 लाख देऊन लग्झरी हॉटेलमध्ये हनिमून; रात्री बाथरुममध्ये पत्नीचा रक्ताने माखलेला मृतदेह

24 तासांचे 3 लाख देऊन लग्झरी हॉटेलमध्ये हनिमून; रात्री बाथरुममध्ये पत्नीचा रक्ताने माखलेला मृतदेह

 या रिसॉर्टचं एका दिवसाचं भाडं ३ लाखांपर्यंत आहे.

या रिसॉर्टचं एका दिवसाचं भाडं ३ लाखांपर्यंत आहे.

या रिसॉर्टचं एका दिवसाचं भाडं ३ लाखांपर्यंत आहे.

    नवी दिल्ली, 22 जुलै :  हनिमूनवर गेलेल्या एका महिला फार्मासिस्टला इतकं मारलं की, यात तिचा मृत्यू झाला. ती एका लग्झरी हॉटेलच्या बाथरुममध्ये मृतावस्थेत सापडली. महिलेच्या हत्येमागे तिच्या पतीचा हात असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हत्येनंतर पती एका बोटीतून फरार झाला. ही घटना एका आयलँडवर घडली. अमेरिकेतील मेम्फिस येथे राहणारी ३९ वर्षीय क्रिस्टे जिओन चेन हिचा मृतदेह ९ जुलै रोजी सापडला. ती फिजी येथील यसावा ग्रुप ऑफ आयलँडवरील टर्टल आयलँड रिसोर्टमध्ये थांबली होती. या रिसॉर्टचं एका दिवसाचं भाडं ३ लाखांपर्यंत आहे. डेली मेलमधील बातमीनुसार, रिपोर्टमध्ये तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आढळल्या आहेत. तिच्यावर डोक्यावरही हल्ल्याचे निशाण आहेत. चेनने ३८ वर्षीय ब्रॅडली रॉबर्टसोबत फेब्रुवारी महिन्यात लग्न केलं होतं. दाम्पत्याने हनिमूनचे पहिले दोन दिवस फिजीमध्ये घालवले. यानंतर चेनची हत्या करण्यात आली होती. आता या प्रकरणात तिच्या पतीला अटक करण्यात आली असून त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. पतीच्या वकिलाने हे सर्व आरोप खोटे असल्याचं सांगितलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ९ जुलै रोजी चेन आणि ब्रॅडली ब्रेकफास्टसाठी उठले नाही. यानंतर हॉटेलमधील कर्मचारी त्यांना पाहण्यासाठी गेला तर खोलीच्या बाहेर डू नॉट डिस्टर्बचा साइन लावला होता. मात्र जेव्हा दोघेही लंचसाठीही बाहेर आले नाही तर त्याने दुसऱ्या किल्लीने दार उघडलं. यावेळी बाथरुममध्ये महिलेचा रक्ताळलेला मृतदेह दिसला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: America, Crime news, Murder, Wife and husband

    पुढील बातम्या