Home /News /crime /

हनिमूनला कळालं पतीचं सत्य; दीराने साधला डाव, पीडितेने सांगितला धक्कादायक प्रकार

हनिमूनला कळालं पतीचं सत्य; दीराने साधला डाव, पीडितेने सांगितला धक्कादायक प्रकार

शेवटी स्वत:चा जीव वाचवून महिला पोलीस ठाण्यात आली.

    लखनऊ, 4 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील हरदोईमधील एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एक वृद्ध महिला आणि तिच्या मुलीने पोलिसांसमोर तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. ते ऐकून अधिकाऱ्यांना धक्काच बसला. पीडितेने पोलिसांना सांगितलं की, लग्नानंतर तिला कळालं तिचा पती शारिरीकदृष्ट्या अनफिट आहे. ज्यामुळे तिचा दीर शरीर संबंधासाठी जबरदस्ती करीत होता. याला महिला विरोध करीत होती. तिची सासरची मंडळी महिलेला जीवे मारण्याचा प्लान करीत होती. तेव्हा कसंबसं ती तेथून पळाली आणि स्वत:चा जीव वाचवला. काय आहे संपूर्ण प्रकरण? एक वृद्ध महिला आपल्या मुलीसह आज पोलीस ठाण्यात पोहोचली आणि मुलीसोबत घडलेला प्रकार सांगितला. पीडितेने सांगितलं की, 13 डिसेंबर रोजी तिचं लग्न रेल्वेगंज भागातील प्रियांशू गुप्ता याच्यासोबत झालं होतं. लग्नानंतर पाठवणी झाल्यानंतर पहिल्याच रात्री तिला पतीचं गुपित कळालं. तिचा पती शारिरीक अक्षम आहे. याचा फायदा घेत तिचा दीर अजित नियमित तिच्यावर जबरदस्ती करीत होता. 14 जून रोजी पती दारू पिऊन घरी आला आणि त्याला जेवण वाढून देण्यास सांगितलं. ती जेवण वाढत असताना तो तिच्यावर जबरदस्ती करू लागला. तिने आरडाओरडा सुरू केला. यानंतर सासू-सासरे धावत आले. त्यांनी मुलाला ओरडण्याऐवजी सुनेलाच मारण्याचा प्लान केला. त्यांनी आधी गरम प्रेस तिच्यावर हातावर लावून चटके दिले.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Rape, Uttar pradesh

    पुढील बातम्या