• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • Honey Trap: पाकिस्तानी गुप्तचर एजंटच्या जाळ्यात अडकला भारतीय जवान, हेरगिरीच्या आरोपात झाली अटक

Honey Trap: पाकिस्तानी गुप्तचर एजंटच्या जाळ्यात अडकला भारतीय जवान, हेरगिरीच्या आरोपात झाली अटक

Honey Trap: पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेची एक महिला एजंट (Women Agent) बनावट फेसबुक अकाऊंटच्या (Fake Facebook Account) माध्यमातून संबंधित जवानाच्या संपर्कात आली होती.

 • Share this:
  जयपूर, 14 मार्च: पाकिस्तानी गुप्तचर (Pakistan Intelligence Agency) एजंटच्या  जाळ्यात अडकून भारतीय सैन्याची (Indian Army) गुप्त माहिती पुरवणाऱ्या एका भारतीय जवानाला (Indian Soldiers) नुकतंच अटक करण्यात आलं आहे.  पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेची एक महिला एजंट (Women Agent) बनावट फेसबुक अकाऊंटच्या (Fake Facebook Account) माध्यमातून संबंधित जवानाच्या संपर्कात आली होती. यानंतर भारतीय जवानाने फेसबुकच्या माध्यमातून भारतीय लष्कराची अनेक गुपित आणि महत्त्वाची माहिती संबंधित महिला एजंटला (Disclose Secret Information) दिली आहे. याप्रकरणी लक्ष्मणगड येथील रहिवासी असलेले संशयित आरोपी आकाश महरिया याला अटक करण्यात आली आहे. एडीजी इंटेलिजेंस उमेश मिश्रा यांनी सांगितलं की, संशयित आरोपी जवानाने भारतीय सैन्याशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला दिली आहे. याप्रकरणी संशयित आकाश महरिया याच्याविरूद्ध ऑफिशिअल सिक्रेट अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विविध सुरक्षा एजन्सींनी त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बर्‍याच दिवसांपासून हेरगिरी सुरू होती आकाश महरिया हा गेल्या बऱ्याच काळापासून हेरगिरी करण्यात सक्रिय असल्याची माहिती चौकशी दरम्यान समोर आली आहे. प्रकरणाची गुप्त माहिती सर्वात आधी जयपूर इंटेलिजन्सला मिळाली होती. त्यानंतर त्यांनी संबंधित जवानावर पाळत ठेवली. त्यानंतर सीआयडी आणि मिलिट्री इंटेलिजेन्सच्या विशेष पथकाद्वारे त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यात आलं होती. तसेच दरम्यान सर्व पुरावे गोळा करण्यात आले. (हे वाचा - सिक्स पॅक पाहून मुंबईतील श्रीमंत महिला अडकली हनी ट्रॅपच्या जाळ्यात, 17 लाखांना बसला फटका!) त्यानंतर संबंधित आरोपी सैन्यातून सुट्टी घेऊन आपल्या गावी आला, तेव्हा सर्व तपास यंत्रणांनी त्याची चौकशी सुरू केली. मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी आकाश महरिया 2018 मध्ये सैन्यात भरती झाला होता. तर सन 2019 मध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, तो एका पाकिस्तानी महिला एजंटच्या जाळ्यात अडकला होता. संबंधित पाकिस्तानी महिला एजंटने छद्म या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट काढून आकाश महरिया याच्याशी संपर्क साधला होता. फेसबुक अकाऊंटवरून फ्रेन्ड रिक्वेस्ट स्विकारल्यानंतर दोघांची मैत्री झाली होती. (हे वाचा - Instagramच्या 'Oyesomya' या अकाउंट पासून सावध राहा) मोबाइलद्वारे माहिती देत होता चौकशी दरम्यान आरोपी आकाश सांगितलं की, तो आपल्या मोबाइलवरून पाकिस्तान महिला एजंटच्या संपर्कात राहिला होता. दरम्यान त्याने भारतीय सैन्य दलाच्या महत्त्वाच्या हालचाली आणि गुपित माहिती संबंधित महिलेला देत होता. आरोपीच्या मोबाइलची तांत्रिक तपासणी केली असता, त्याने गुप्त माहिती देण्यासोबतच पाकिस्तानी महिला एजंटाशी अनेक प्रकारच्या अश्लील गप्पा मारल्या आहेत. आरोपी आकाशचा मोबाइल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
  Published by:News18 Desk
  First published: