मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Honey Trap : पाकिस्तानी महिलेच्या जाळ्यात अडकला, भावनांमध्ये वाहत जावून सैनिकाचं शरमेनं मान खाली घालवणारं कृत्य

Honey Trap : पाकिस्तानी महिलेच्या जाळ्यात अडकला, भावनांमध्ये वाहत जावून सैनिकाचं शरमेनं मान खाली घालवणारं कृत्य

आरोपीला पाटण्यात बेड्या

आरोपीला पाटण्यात बेड्या

इंटेलिजेन्स ब्युरो (IB) आणि मिलेट्री इंटेलिजेन्स यांना भारतीय सैन्यातील एक जवान लष्कराची महत्त्वपूर्ण माहिती पाकिस्तानातील व्यक्तीला देत असल्याची माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर बिहारच्या दहशतवाद विरोधी पथकाने (Bihar ATS) कारवाई केली.

पुढे वाचा ...
  • Published by:  Chetan Patil

पाटणा, 14 नोव्हेंबर : चोर (Thief), हेरगिरी करणारे भामटे (Spy) यांची सध्या गुन्हेगारी करण्याची पद्धत प्रचंड बदलत चालली आहे. विशेष म्हणजे जसजसं तंत्रज्ञान पुढे जातंय तसतसं ते देखील गुन्हेगारीचे (Crime) वेगवेगळे मार्ग शोधून काढत आहेत. वेगवेगळ्या पायवाटा शोधत आहेत. त्यापैकीच हनीट्रॅप (Honey Trap) हा एक प्रकार. सोशल मीडियाचा (Social Media) वापर करुन हनीट्रॅपच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक (Fraud) झाल्याच्या अनेक घटना याआधी समोर आल्या आहेत. पण या घटनांमधून काहीजण काहीच बोध घेत नसल्याचं उघड होतंय. विशेष म्हणजे भारतीय सैन्यात (Indian Army) कार्यरत असलेला एक जबाबदार सैनिक (Soldier) अशाप्रकारे एखाद्या हनीट्रॅपमध्ये अडकून भारतीय लष्कराशी संबंधित माहिती पाकिस्तानातील (Pakistan) महिलेला देत असल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार खरंतय अतिशय निंदणीय आहे. या सैनिकाला बिहार एटीएसने (Bihar ATS) बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

इंटेलिजेन्स ब्युरो (IB) आणि मिलेट्री इंटेलिजेन्स यांना भारतीय सैन्यातील एक जवान लष्कराची महत्त्वपूर्ण माहिती पाकिस्तानातील व्यक्तीला देत असल्याची माहिती मिळाली होती. याच माहितीच्या आधारावर बिहारच्या दहशतवाद विरोधी पथकाने (Bihar ATS) कारवाई करत संबंधित सैनिकाला बेड्या ठोकल्या. या जवानाला एटीएसने पाटण्याजवळ खगोल परिसरात पकडत अटक केली. आरोपी जवानाचं गणेश कुमार असं नाव आहे. तो बिहारच्या नालंदा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आलीय. तसेच तो सध्या महाराष्ट्रातील पुणे (Pune) जिल्ह्यात पोस्टिंगला होता.

हेही वाचा : एका रात्रीचे 25 हजार; टूरिस्ट व्हिजावर भारतात आलेल्या तरुणींचा भांडाफोड

आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

बिहार पोलिसांनी आरोपी गणेश कुमारची कसून चौकशी केली. यावेळी त्याने आपण पाकिस्तानी महिलेसोबत माहिती शेअर केल्याचं कबूल केलं आहे. पाकिस्तानी महिलेने आरोपीला आपण नेवीच्या मेडिकल टीममध्ये कार्यरत असल्याची माहिती दिली होती. तिने आपली ओळख लपवत दोन वर्षांपूर्वी गणेशसोबत मैत्री केली होती. त्यावेळी तो राजस्थानच्या जोधपूर येथे पोस्टिंगला होता, अशी माहिती आरोपी गणेशने स्वत: पोलिसांना चौकशीदरम्यान दिली आहे.

हेही वाचा : मुलाच्या वाढदिवशी घरी येण्याचं वचन, पण अतिरेकी हल्ल्यात जवान शहीद

पोलिसांकडून आरोपीचा मोबाईल जप्त

"आमच्यात फोनवर नेहमी बोलणं व्हायचं. त्यावेळी पाकिस्तानी महिलेसोबत मी भारतीय सैन्याशी संबंधित बरीच महिती शेअर केली. यामध्ये लष्करी रुग्णालय कशाप्रकारे काम करतं, त्यांचं किती युनिट आहे, या विषयी माहिती दिली होती", असं आरोपी गणेशने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला आहे. पोलीस त्याचा मोबाईल तपासत आहेत. पोलीस आरोपींमध्ये सोशल मीडियाद्वारे झालेल्या संभाषणाची माहिती गोळा करत आहेत. या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे खुलासे होऊ शकतात, असा दावा सूत्रांनी केलाय. दरम्यान, सुरक्षा यंत्रणांकडून सध्या तपास सुरु आहे.

First published:

Tags: Indian army