फेसबुकवर समलैंगिक नातं जुळलं; प्रेमात पडली फूट, पीडित्याने दृष्कृत्याचा गुन्हा केला दाखल.

फेसबुकवर समलैंगिक नातं जुळलं; प्रेमात पडली फूट, पीडित्याने दृष्कृत्याचा गुन्हा केला दाखल.

पीडित्यावर याचा इतका परिणाम झाला होता की त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला

  • Share this:

इंदूर, 6 ऑगस्ट : शहडोल जिल्ह्यातील बुढार पोलीस ठाणे भागात समलैंगिक संबंधांचं प्रकरण समोर आलं आहे. येथे दोन तरुणांमध्ये पहिल्यांदा फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली. त्यानंतर शारिरीक संबंध झाले. त्याचा व्हिडीओही शूट केला. जेव्हा पीडित्याने नकार दिला तेव्हा आरोपीने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अनेकदा शारिरीक बळजबरी केली. या प्रकरणात बुढार पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला ताब्यातही घेण्यात आलं आहे.

पोलीस ठाण्याचे प्रमूख महेंद्र सिंह चौहान यांनी सांगितले की, छत्तीसगडमधील खडगवा येथे राहणाऱ्या शादाब (23) याने गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये त्याने सांगितले की येथील धनपुरी भागात आरोपी सुनीलसोबत त्याची फेसबुकवर मैत्री झाली. त्यानंतर सुनीलने शादाबला आपल्या घरी एका कार्यक्रमात बोलावले. येथे दोघांनी खूप दारु प्यायली. यानंतर नशेत शादाब झोपला, त्यात सुनीलने त्याच्यासोबत दृष्कृत्य केले.

समुपदेशनानंतर सत्य आलं समोर

पीडित तरुण शादाब याने काही दिवसांपूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचं समुपदेशनानंतर हे सत्य समोर आलं. शादाबने सांगितले की सुनील त्याला इतका त्रास देत होता की त्याला शारिरीक संबंधांसाठी छत्तीसगडहून मध्यप्रदेशात यावं लागत होतं. तब्बल 6 महिन्यांपूर्वी सुनील त्याला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला होता. त्यानंतर त्याचे काही मित्रही आले होते. तेव्हा सर्वजण दारू प्यायले आणि त्यानंतर शादाबसोबत दृष्कृत्य केलं. यादरम्यान व्हिडीओ केला. त्यानंतर शादाबला हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत कधी हॉटेल तर कधी जंगलात नेत त्याच्यावर अनैसर्गिक पद्धतीने संबंध ठेवत होता.

दोन दिवसांपूर्वी आरोपीने शादाबला फोन करुन बुढार येण्यास संगितलं होतं. शादाबने नकार दिल्यास सुनीलने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर शादाब कुटुंबीयांसह पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यानंतर पोलीस शादाबसह बुढार येथे गेले. तेथे बस स्टॉपवर उतरताना सुनीलला फोन लावला. थोड्या वेळाने सुनील त्याला घ्यायला आला तेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं.

Published by: Meenal Gangurde
First published: August 6, 2020, 6:53 PM IST

ताज्या बातम्या