• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • कोरोना काळात घरातून सुरू केला नवा व्यवसाय; आता तुरुंगाची हवा खाण्याची आली वेळ

कोरोना काळात घरातून सुरू केला नवा व्यवसाय; आता तुरुंगाची हवा खाण्याची आली वेळ

झटपट श्रीमंत होण्यासाठी त्याने नोकरी करीत असताना या व्यवसायाबद्दल माहिती मिळवली होती.

 • Share this:
  फरीदाबाद, 24 नोव्हेंबर : लॉकडाऊनमध्ये नोकरी सुटल्याने अनेकांनी घरबसल्या नवा बिझनेस सुरू केला. मात्र हरयाणातील (Haryana News) फरिदाबाद येथे एका पठ्ठ्याने असा काही बिझनेस सुरू केला की, त्याला तुरुंगाची हवा खावी लागत आहे. सुरुवातील या पठ्ठ्याने एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. यानंतर काही तरुणांना त्यात समाविष्ट केले. या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून ही व्यक्ती तरुणांना जुगार खेळण्यासाठी उद्युक्त करीत होती. गर्दी वाढवण्यासाठी तो दारूच्या पार्टीचीही सोय करीत होता. क्राइम ब्रांन्चला याबद्दल सूचना मिळताच सोमवारी रात्री उशिरा त्याच्या घरात छापेमारी (Crime news) करण्यात आली.  (Home raid on the house of the person running the casino club In haryana) ही व्यक्ती घरात कसीनो क्लब (Casino Club) चालवित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणात पोलिसांनी 18 जणांना ताब्यात घेतलं. अटक केलेल्यांमध्ये 3 आरोपी उत्तराखंड आणि अन्य 15 आरोपी फरीदाबाद येथील आहेत. पैसे दुप्पट होण्याच्या हव्यासापोटी लोक येथे येऊन जुगार खेळत होते. मिळालेल्या माहितीनुसार अनेक हायप्रोफाइल लोक हा खेळ खेळत होते. या प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, त्यांना या प्रकरणात सूचना मिळाली होती. येथे लुडोच्या सोंगट्याच्या साहाय्याने जुगार खेळला जात होता. सूचना मिळाल्यानंतर त्यांनी एका टीमचं गठण केलं. आणि न्यू जनता कॉलनीस्थित एका घरावर रात्री 2 वाजता छापेमारी केली. यावेळी मुख्य आरोपी यश याला अटक करण्यात आली आहे. क्राइम ब्रान्चने घटनास्थळाहून यश, मिथुन, ललित, गौरव, मनीष, शशांक, जगपाल, राजीव, अशोक, सागर, विकी, वरुण, राहुल, अनुज, चंदन, तरुण, गौतम आणि अमित यांना ताब्यात घेतलं आहे. अनेक राज्यांमध्ये पसरलं नेटवर्क.. पोलीस सूत्रांनी सांगितलं की, येथे जुगार खेळण्यासाठी लोक दिल्ली-एनसीआपसह अनेक राज्यांतून येतात. इतकच नाही तर आरोपीने व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. याच्या माध्यमातून तो लोकांना येथे सट्टा आणि जुगारात सामील होण्याची लालच देत होता. व्हिडीओ कॉलच्या माध्यमातूनही जुगार खेळला जात होता. आरोपी यशने एक महिन्यापूर्वीच हा व्यवसाय सुरू केला होता. हे ही वाचा-महिलेनं ऑफिसला लावला 7 कोटींचा चुना, कारण ऐकून मालकालाही धक्का 13 लाखांचे टोकन आणि 96.8 हजार कॅश जप्त आरोपीकडून 13.55 लाख रुपयांच्या किमतीचे टोकन आणि 96.8 हजार रुपयांची कॅश जप्त करण्यात आली. लवकर पैसे कमविण्याच्या हव्यासापोटी आरोपीने हा व्यवसाय सुरू केला होता. सूत्रांनी सांगितलं की, नव्या वर्षात आरोपीची मोठ्या स्तरावर जुगार खेळण्याची तयारी होती. यासाठी हरयाणा, पंजाबमध्ये अनेक जिल्ह्यांत त्याने आपलं जाळं पसरवलं होतं. जुगार खेळण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी यशने डान्स आणि महागड्या दारू पार्टीचं आयोजनही करणार होता. नोकरी करीत असताना त्याने कसीनोचं काम कसं चालतं याबद्दल माहिती मिळवली होती. यानंतर तो श्रीमंत होण्याचं स्वप्न पाहू लागला.  
  Published by:Meenal Gangurde
  First published: