मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

'Drugs च्या ओव्हर डोसमुळे माझा मृत्यू झाला असता...', प्रसिद्ध गायिकेने मांडला धक्कादायक भुतकाळ

'Drugs च्या ओव्हर डोसमुळे माझा मृत्यू झाला असता...', प्रसिद्ध गायिकेने मांडला धक्कादायक भुतकाळ

प्रसिद्ध अमेरिकन सिंगर (Ameriacan Singer) आणि साँग रायटर डेमी लोवाटोनं (Demi Lovato) खुलासा केला आहे की, ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळं माझा मृत्यू झाला असता.

प्रसिद्ध अमेरिकन सिंगर (Ameriacan Singer) आणि साँग रायटर डेमी लोवाटोनं (Demi Lovato) खुलासा केला आहे की, ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळं माझा मृत्यू झाला असता.

प्रसिद्ध अमेरिकन सिंगर (Ameriacan Singer) आणि साँग रायटर डेमी लोवाटोनं (Demi Lovato) खुलासा केला आहे की, ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळं माझा मृत्यू झाला असता.

न्यूयॉर्क, 22 मार्च: बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक सेलिब्रिटींची नाव समोर आली आहेत जे ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहेत. ड्रग्जमुळे अनेक जण मृत्यूच्या दाढेत लोटले गेले होते पण वैद्यकीय उपचारांमुळे वाचले आहेत. अशामध्येच प्रसिद्ध अमेरिकन सिंगर (American Singer) आणि साँग रायटर डेमी लोवाटोनं (Demi Lovato) खुलासा केला आहे की, ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळं माझा मृत्यू झाला असता. डेमी लोवाटोच्या जीवनावर आधारित एक डॉक्युमेंट्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पीपल मॅग्झिनने (People Magazine) दिलेल्या वृत्तानुसार, ही डॉक्युमेंट्री युट्यूबवर 23 मार्चला रिलीज होणार आहे.

डेमीनं आपल्या ड्रग्ज व्यसनाबाबत खुलासा केला आहे की, ड्रग्जमुळं जुलै 2008 मध्ये तिची अवस्था अशी झाली होती की ती मरतामरता वाचली होती. 28 वर्षांच्या डेमीनं सांगितलं की, ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळं ती मृत्यूच्या जवळ पोहचली होती. तिला ड्रग्जचा ओव्हर डोस दिला होता. तिला मरण्यासाठी सोडून दिलं होतं. त्या दिवसाबद्दल विचार केला तरी आता डेमी घाबरते. वयाच्या पंधराव्या वर्षी डेमीसोबत हा वाईट प्रसंग घडला होता.

अमेरिकेच्या एका वीकली मॅग्झिनला दिलेल्या मुलाखतीत डेमीनं सांगितलं की, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं की मी फक्त 10 मिनिटंच जगू शकेल. ही तर देवाची कृपा आहे की मी वाचले. डेमी लोवाटोच्या जीवनावर आधारित  डॉक्युमेंट्री लवकरच येणार असून या डॉक्युमेंट्रीचं नाव 'डेमी लोवाटो: डांसिंग विद द डेविल' (Demi Lovato: Dancing with the Devil) असं आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये ड्रग्जमुळं डेमीवर आलेल्या संकटाबद्दल सांगण्यात आलं आहे. डेमी तिच्या किशोरवयीन आयुष्यात सर्वात वाईट परिस्थितीतून गेली आहे.

(हे वाचा-या डायलॉगमुळं अक्षय पडला ‘केसरी’च्या प्रेमात; वाचा काय होता मजेशीर किस्सा)

या चित्रपटात डेमीनं त्या रात्रीच्या घटनेविषयी आपलं म्हणणं सांगितलं आहे. तेव्हा तिला वाटलं होतं की ती तिची शेवटची रात्र होती. डेमी म्हणाली की, जेव्हा मी बेशुद्ध पडले तेव्हा माझ्या शरीरावर कपडे नव्हते. माझ्यावर बलात्कार झाला होता. मी जवळपास मेलेच होते. रुग्णालयात जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा डॉक्टरांनी मला हे सर्व तुझ्या इच्छेनुसार झालं आहे का असं विचारलं होतं. तेव्हा मी हो म्हणाले होते कारण मला ड्रग्जचा ओव्हरडोस दिला हातो आणि मी कोणताही निर्णय घेण्याच्या स्थितीत नव्हते.

(हे वाचा-बॉलिवूडमधील तारा निखळला; चांदनी, सिलसिला चित्रपटाचे निर्माता काळाच्या पडद्याआड)

दरम्यान, डेमी लोवाटो एकेकाळी गायक निक जोनासची चांगली मैत्रीण होती. डेमीसोबत घडलेल्या या वाईट घटनेनंतर निक जोनासनं (nick Jonas) ट्वीट करत ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली होती. डेमीचा एक मित्र Sirah Mitchell याने डॉक्युमेट्रीमध्ये त्या संबंधित ड्रग डिलरबद्दल सांगितलं आहे. त्याने सांगितलं की, संबंधित ड्रग डिलरने डेमीला हेरोईन दिलं होतं. हे हेरोईन fentanyl ने भरलेलं होतं. ज्यामुळे तिची अक्षरशः शुद्ध हरपली होती. त्यानंतर त्याने तिला मरण्यासाठी तसंच सोडून दिलं होतं.

First published:

Tags: Bollywood, Crime, Drug case, Drugs, Hollywood, Nick jonas, Priyanka chopra, Rape, Singer, United States of America