मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /होळीनिमीत्त एका मोबाईलवर दारूच्या दोन बाटल्या फ्री, ऑफर दिली अन् जेलमध्ये गेला

होळीनिमीत्त एका मोबाईलवर दारूच्या दोन बाटल्या फ्री, ऑफर दिली अन् जेलमध्ये गेला

उत्तर प्रदेशातल्या एका दुकानदाराने जाहीर केलेली ऑफर त्याला चांगलीच महागात पडली आहे.

उत्तर प्रदेशातल्या एका दुकानदाराने जाहीर केलेली ऑफर त्याला चांगलीच महागात पडली आहे.

उत्तर प्रदेशातल्या एका दुकानदाराने जाहीर केलेली ऑफर त्याला चांगलीच महागात पडली आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Uttar Pradesh, India

नवी दिल्ली, 07 मार्च : होळी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. होळीच्या निमित्ताने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानदार निरनिराळ्या ऑफर लाँच करत असतात; मात्र उत्तर प्रदेशातल्या एका दुकानदाराने जाहीर केलेली ऑफर त्याला चांगलीच महागात पडली आहे. होळीच्या निमित्ताने एका मोबाइल विक्रेत्याने मोबाइल खरेदीवर एक स्पेशल स्कीम लाँच केली. जो ग्राहक त्याच्याकडून अँड्रॉइड मोबाइल खरेदी करील त्याला मोबाइलसोबत बीअरच्या दोन बाटल्या मोफत मिळतील, अशी ही स्कीम होती.

ती स्कीम दुकानदाराला भलतीच महागात पडली. पोलिसांनी या दुकानदारावर कारवाई करून त्याला अटक केली आहे. तसंच पोलिसांनी होळीच्या पार्श्वभूमीवर शांतता भंग होऊ नये, यासाठी अवैध मद्यनिर्मिती करणाऱ्यांवरही कारवाई केली आहे. `आज तक`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

होळीची अनोखी परंपरा; या ठिकाणी स्पर्धेत हरणाऱ्याला वाटावी लागते मिठाई

उत्तर प्रदेशातल्या भदोहीमधील रेवडा पारसपूरनजीकच्या एका मोबाइल विक्रेत्याने होळीच्या निमित्ताने अँड्रॉइड मोबाइल खरेदी केल्यास ग्राहकाला बीअरच्या दोन बाटल्या मोफत मिळतील अशी स्कीम लाँच केली. या स्कीमच्या प्रचारामुळे दुकानदार अडचणीत आला. पोलिसांनी आरोपी दुकानदाराला अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की दुकानातून एक अँड्रॉइड मोबाइल खरेदी केल्यास त्यावर बीअरच्या दोन बाटल्या मोफत मिळतील, अशी जाहिरात मोबाइल विक्रेता राजेश मौर्य याने केली.

राजेशने मोबाइलसोबत बीअरचा फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर केला. या स्कीमला त्याने `होळी बंपर धमाका` असं नाव दिलं. पोलिसांना या स्कीमची माहिती मिळताच त्यांनी या प्रकाराचा तपास सुरू केला. प्रकरणात तथ्य आढळल्यानंतर पोलिसांनी मोबाइल दुकानदार राजेश मौर्यला अटक करून त्याच्यावर कारवाई केली आहे. अशा प्रकारच्या जाहिरातीमुळे होळीच्या पार्श्वभूमीवर शांतता भंग होण्याची शक्यता होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Dhulivandan 2023 : लोकल ट्रेनमध्ये महिलांची धुळवड; एकमेकींवर केली रंगांची उधळण, Video Viral

दरम्यान, पश्चिम विभागाचे अपर पोलीस अधीक्षक दुर्गेश कुमार सिंह यांनी सांगितलं, की `एसपी राजेश द्विवेदी यांच्या आदेशानुसार होळीच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात एक मोहीम राबवण्यात आली. त्याअंतर्गत अवैध दारू तयार करणाऱ्या 202 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 3778 लीटर अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत पोलिसांनी दारू बनवणाऱ्या 58 हातभट्ट्यांवरही कारवाई केली आहे. रविवारी (5मार्च) मोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली.

First published:
top videos

    Tags: Holi 2023, Mobile Phone, Uttar pradesh news