मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Ulhasnagar: अंगावर फुगा मारल्याचा जाब विचारल्याने बेदम मारहाण, तरुणाचा डोळा थोडक्यात बचावला

Ulhasnagar: अंगावर फुगा मारल्याचा जाब विचारल्याने बेदम मारहाण, तरुणाचा डोळा थोडक्यात बचावला

फुगा मारल्याचा जाब विचारल्याचा राग; तरुणावर प्राणघातक हल्ला, डोळा थोडक्यात बचावला

फुगा मारल्याचा जाब विचारल्याचा राग; तरुणावर प्राणघातक हल्ला, डोळा थोडक्यात बचावला

Holi 2022: सर्वत्र धुळवड साजरी करण्यात येत आहे. मात्र, त्याच दरम्यान उल्हासनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. फुगा मारल्याचा जाब विचारणा केल्याने एका मुलावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

उल्हासनगर, 18 मार्च : होळी (Holi) आणि धुळवडीचा (Dhulvad) सण सगळीकडे अतिशय गुण्यागोविंदाने साजरा होत असताना उल्हासनगर शहरात मात्र एका तरुणाला मारहाण झाल्याने या सणाला काहीसं गालबोट लागलं आहे. पाण्याचा फुगा मारल्याचा जाब विचारणाऱ्या एका 16 वर्षीय विद्यार्थीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. उल्हासनगर (Ulhasnagar)मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

तरुणावर प्राणघातक हल्ला

जयेश गिझलानी या विद्यार्थ्यांला चावीच्या साहाय्याने डोळ्याजवळ मारण्यात आले, सुदैवाने त्याचा डोळा यात थोडक्यात बचावला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयेश हा होळीच्या दिवशी कोचिंग क्लासेसहून घरी परतत होता. त्याचवेळी काही मुलं रस्त्यातून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर पाण्याने भरलेले फुगे मारत होते. त्यांनी जयेशच्या अंगावर देखील फुगा मारला.

वाचा : रंगाचा बेरंग; धुळवडीच्या फुग्याने घेतला बळी, फुगा मारल्याने अपघातात एकाचा मृत्यू

फुगा मारल्याचा जाब विचारल्याने आला राग

आपल्यावर फुगा मारल्याचा जयेश याने जाब विचारला. मात्र याचा राग आल्याने एका तरुणाने त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत जयेशच्या डोळ्याखाली गंभीर जखम झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या तरुणाला आणून बसवले होते. परंतु त्याठिकाणावरून पोलिसांना चकमा देऊन तो पसार झाला.

आरोपी तरुण नगरसेवकाचा नातेवाईक असल्याची चर्चा

मारहाण करणारा तरुण हा उल्हासनगरमधील एका नगरसेवकाचा नातेवाईक असल्याचे बोलले जात आहे. सध्या पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकारामुळे जयेशच्या वडिलांनी पोलिसांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

वाचा : झुकेगा नही, म्हणणाऱ्या भाईला पोलिसांनी भर रस्त्यात चांगलाच झुकवला, महाराष्ट्र पोलिसांच्या कारवाईचा VIDEO VIRAL

मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव मला माहीत नाही, मात्र मला मारहाण होत असताना या तरुणाचे वडील तिथे आले त्यांनी देखील आपल्याला मारहाण केली. तू पोलीस चौकीत जा... कुठेही जा... तिथे येऊन तुला मारू अशा प्रकारची धमकी मला मारहाण करणाऱ्या तरुणाच्या वडीलांनी दिल्याचा आरोप जखमी जयेश गिझलानी या तरुणाने केला आहे.

मारहाण करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणलं होतं. मात्र तो पोलिसांना चकवा देत कसा काय पळून गेला, की त्याला तिथून पळून जाण्यास कोणी मदत केली असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

First published:

Tags: Crime, Ulhasnagar